राष्ट्रवादीकडून कल्पिता पाटील विधानसभेच्या रिंगणात !

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अनेक दिग्गज नेत्यांनी सोडचिट्ठी दिल्यानंतर शरद पवारांनी स्वतः तरुण उमेदवारांची नवी फळी उभारण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. पवारांनी बीड दौऱ्यावर असताना आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली त्यापैकी चार उमेदवार हे नवीन आणि तरुण उमेदवार आहेत.

जळगावातही एका युवा नेत्याने पवारांकडे उमेदवारी मागितल्याची चर्चा आहे. जळगाव ग्रामीणमध्ये शिवसेनेचे गुलाबराव पाटील हे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर हे होते. मात्र घरकुल घोटाळ्यात त्यांचे नाव पुढे आल्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत संशय व्यक्त केला जातोय. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेऊन विधानसभेसाठी आशीर्वाद घेतल्याचे समजते.

गुलाबराव देवकारांऐवजी सध्या राष्ट्रवादीत कल्पिता पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु झाल्याने जळगावचे राजकारण बदलणार कि काय ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. कल्पिता पाटील या महाराष्ट्रातील सर्वात तरुण सरपंच आहेत आणि राष्ट्रवादीमध्ये कार्यरत असल्यामुळे त्यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो.

Visit : policenama.com