PM मोदींना पुढची 10 ते 20 वर्ष पर्याय नाही : बाबा रामदेव

पोलीसनामा ऑनलाईनः मी मोदींचा भक्त नाही पण एक राष्ट्रभक्त नक्कीच आहे. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra-modi) हे देखील राष्ट्रभक्त आहेत. त्यामुळे आगामी 10 ते 20 वर्षे त्यांना काहीही पर्याय नाही असे योगगुरू बाबा रामदेव (yoga-guru-baba-ramdev) यांनी (next-ten-twenty-years-no-option-narendra-modi) म्हटले आहे. राहुल गांधी यांनी त्रियोग करावा तर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी मौन योग करावा असा खोचक सल्लाही बाबा रामदेव यांनी दिला आहे.

बाबा रामदेव एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. देशात मोदी फॅक्टर आहे का? असे प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी उत्तर दिले की, कोट्यवधी लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. त्यांच्यात आणि इतर राजकारण्यांमध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. सगळ्या देशाला हे माहित आहे की, मोदींना स्वतःसाठी काहीही नको आहे जे काही करायचे आहे ते देशासाठी करायचे आहे. प्रभू कृपेने त्यांना हे सगळ काही मिळालं असल्याचे बाबा रामदेव म्हणाले. तुम्ही मोदी भक्त आहात असा आरोप तुमच्यावर होतो असे जेव्हा बाबा रामदेव यांना विचारले तेंव्हा ते म्हणाले की, मी मोदीभक्त नाही तर राष्ट्रभक्त आहे. मी प्रभू, गाव, गरीब, मजूर, शेतकरी, दलित, शोषित, वंचित, मागासवर्गीय यांचा भक्त आहे. मी योगी आहे आणि कर्मयोगी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रभक्त आहेत त्यामुळे मी त्यांचा सहयोगी असल्याचे उत्तर बाबा रामदेव यांनी दिले आहे.