आरोग्य सेतू अ‍ॅप : ‘हे’ व्हर्जन पुढील 2 आठवड्यात येणार, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतात देखील कोरोना विषाणूने शिरकाव केला असून कोरोना विषाणूवर आळा घालण्यासाठी भारत सरकारने आरोग्य सेतू अ‍ॅप खूप महत्त्वाचे असल्याचे सांगितलं. यामुळे 3 एप्रिलला भारत सरकारने आरोग्य सेतू अ‍ॅप लॉन्च केलं. मात्र, हे अ‍ॅप वापरणाऱ्या युजर्संने सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण केले होते. कारण या अ‍ॅपवर रजिस्टर करण्यासाठी युजरला त्याचे नाव, लिंग, ट्रॅव्हल हिस्ट्री, मोबाईल क्रमांक आणि लोकेशन इत्यादी माहिती द्यावी लागत होती. सरकारने अ‍ॅप लॉन्च केले मात्र त्याचा सोर्स जाहीर केला नव्हता. त्यामुळे अनेकांच्या मनात या अ‍ॅप बाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले. परंतु आता घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे राष्ट्रीय माहिती केंद्राने सांगितले आहे. सरकारच्या माहितीनुसार 11 कोटींपेक्षा जास्त नागरिक हे अ‍ॅप वापरत आहेत.

देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असून अनेक लोकांना याची लागण झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊन वाढवला. कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी आणि लोकांपर्यंत सत्य माहिती पोहचवण्यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू अ‍ॅप लॉन्च केले. हे अ‍ॅप सरकारी आणि खासगी कार्यालयात काम करणाऱ्यांना सुरु ठेवणे सरकारने बंधनकारक केले. हे अ‍ॅप राष्ट्रीय माहिती केंद्राने तयार केले असून गेल्या आठवड्यात या अ‍ॅपमधील सर्विस आणि प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल करण्यात आले आहेत. आरोग्य सेतू अ‍ॅपमध्ये आयओएस व्हर्जन पुढील दोन आठवड्यात लॉन्च होणार आहे. याबाबत एका इंग्रजी दैनिकाने वृत्त दिले आहे. यामुळे घाबरण्याचे कारण नाही आणि अ‍ॅप मधील डाटा चोरीला जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

कोरोना व्हायरसची जोखी कितपत आहे, याबाबत आकलन करणारे हे अ‍ॅप राष्ट्रीय माहिती केंद्राने लॉन्च केले आहे. जोपर्यंत कोरोनावर कोणतीही लस निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्याला सोशल डिस्टन्सिंग, हात धुत राहणे या गोष्टी सतत कराव्या लागणार आहेत. पण यालाच जोड देत केंद्र सरकारने कोरोनाची माहिती देण्यासाठी तसेच आपण कोणत्या व्यक्तिस भेटतो, कुठे जातो, तिथे कोरोनाचे कोणते रुग्ण आहेत का ? अशा प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तसेच कोरोना व्हायरसबाबत अलर्ट राहण्यासाठी सरकारकडून हे अ‍ॅप तयार केले आहे.

आरोग्या सेतू अ‍ॅपने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य सेतू अ‍ॅप वपरकर्ता अ‍ॅपमध्ये नोंदणी करताना संपर्काबाबतची माहिती जमा करतो. वापरकर्त्याच्या भागात कोरोना रुग्ण आढळल्यास त्याच्या स्थानाबाबत माहिती मिळते आणि ही माहिती सुरक्षित सर्व्हरमध्ये सेव्ह केली जाते. कोरोना संदर्भातील माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने लॉन्च केलेले अ‍ॅप सर्व खासगी आणि सरकारी कर्मचारी तसेच कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या सर्वांना हे अ‍ॅप वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.