देशात वाढतंय ‘कुपोषण’ आणि ‘लठ्ठपणा’, 22 राज्यांच्या NFHS रिपोर्टमध्ये समोर आले धक्कादायक आकडे

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शनिवारी नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे (एनएफएचएस) च्या पाचव्या रिपोर्टचा पहिला भाग जारी करण्यात आला आहे. यामध्ये 2019-20 मध्ये करण्यात आलेल्या सर्वेचे आकडे आहेत. हा सर्वे तीन वर्षाच्या अंतरानंतर करण्यात आला आहे. एनएफएचएसच्या पहिल्या आवृत्तीच्या रिपोर्टमध्ये देशातील 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सहभागी करण्यात आले आहे. या राज्यांमध्ये देशाची अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या राहते. यामध्ये काही मोठी राज्य महाराष्ट्र, बिहार आणि पश्चिम बंगालचा सहभाग असून सर्वाधिक लोकसंख्या असलेला उत्तर प्रदेशचा समावेश नाही.

मुलांमधील कुपोषण वाढले
एनएफएचएसच्या या पाचव्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, देशातील मुलांमध्ये कुपोषण वाढले आहे. ही चिंताजनक स्थिती आहे. यापूर्वी एनएफएचएसच्या चौथ्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की, देशात मुलांमध्ये कुपोषण कमी झाली आहे. आता पाचव्या रिपोर्टमध्ये तो वाढल्याचे म्हटले आहे. यामध्ये आपल्या वयाच्या सामान्य उंचीपेक्षा कमी मुलांचा सहभाग 13 राज्यांमध्ये वाढला आहे. तर आपल्या उंचीच्या हिशेबाने कमी वजनाच्या प्रकरणात 12 राज्यांमध्ये मुलांची संख्या वाढली आहे.

वयाच्या तुलनेत कमी उंचीवाल्या मुलांमध्ये ही टॉप राज्य
या यादीत बिहार टॉपवर आहे. बिहारमध्ये 2015-16 हे प्रमाण 48.3 टक्के होते, जे आता 42.9 टक्के झाले. दुसर्‍या स्थानावर गुजरात आहे. गुजरातमध्ये हे प्रमाण 39.0 टक्के आहे. तिसर्‍या नंबरवर कर्नाटक आहे. कर्नाटकमध्ये हे प्रमाण 35.4 टक्के आहे.

कमी वजनाच्या मुलांच्या बाबतीत टॉप 3 राज्य
या श्रेणीत सुद्धा बिहार टॉपवर आहे. राज्यात 2005-06 मध्ये हे प्रमाण 16.5 टक्के होते. 2015-16 मध्ये 25.6 टक्के होते. आता 2019-20 मध्ये हे प्रमाण 25.6 टक्के झाले आहे. बिहारमध्ये 2015-16 मध्ये हे प्रमाण 20.8 टक्के होते. आता 22.9 टक्के झाले आहे. गुजरातमध्ये 2015-16 मध्ये हे प्रमाण 26.4 टक्के होते. आता सुद्धा ते 25.1 टक्के आहे.

याशिवाय लठ्ठ मुलांच्या प्रकारातसुद्धा वाढ झाली आहे. 16 राज्यांमध्ये कमी वजनाच्या मुलांची संख्या वाढत आहे. तर 20 राज्यांमध्ये जास्त वजनाची मुले वाढत आहेत.

लठ्ठपणासुद्धा वाढतोय
यासोबतच देशात लठ्ठपणा आणि रक्तच्या कमतरतेशी झगडणार्‍या लोकांच्या संख्येत सुद्धा वाढ झाली आहे. 22 पैकी 19 राज्यांमध्ये पुरूषांमध्ये लठ्ठपणा वाढला आहे. तर 16 राज्यांत महिलांमध्ये याची वाढ दिसून आली आहे. कर्नाटकमध्ये सर्वात जास्त महिलांमध्ये सर्वात जास्त लठ्ठपणा दिसून आला. तो 6.8 टक्के आहे. तर पुरूषांमध्ये सर्वात जास्त लठ्ठपणा जम्मू-काश्मीरमध्ये दिसून आला. येथे हे प्रमाण 11.1 टक्के आहे.