मशिदींमुळे ध्वनी प्रदूषण होते का?; प्रदूषण नियंत्रण समितीकडून चौकशी होणार

नवी दिल्ली: वृत्तसंस्था
दिल्लीतल्या सात मशिदींमधून ध्वनी प्रदूषण होत असल्याची तक्रार अखंड भारत युवा मोर्चा या संघटनेने राष्ट्रीय हरित लवादामध्ये दाखल केली होती. त्यावरुन राष्ट्रीय हरित लवादाने पूर्व दिल्लीतील सात मशिदींमधून ध्वनी प्रदूषण होते आहे का याची चौकशी करण्याचे आदेश दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीला दिले आहेत.
पूर्व दिल्ली येथील, सुनहरी मशीद, लक्ष्मी नगर मशीद, अनारकली मशीद, बिस्मिल्लाह मशीद, सरोजिनी नायडू पार्क मशीद, बिहारी कॉलोनी मशीद आणि मधु विहार मशीद या मशिदींमधून ध्वनिप्रदूषण होत असल्याचा अखंड भारत मोर्चा या संघटनेचा आरोप आहे. या मशिदींमधील आवाजाची पातळी नियंत्रित नसल्यामुळे स्थानिकांना प्रचंड त्रास होतो आहे. तसंच अनेकांच्या प्रकृतीवरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचाही आरोप आहे. यापूर्वीही या सात मशिदींबद्द्ल तक्रारी दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीकडे दाखल करण्यात आल्या होत्या. पण दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं होत.
 [amazon_link asins=’B07C4YKR3J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2bc266fe-9d38-11e8-b190-13280dc8cb44′]
अखंड भारत मोर्चाच्या या याचिकेवर सुनावणी करताना संबंधित मशिदींमधील ध्वनिप्रदूषणाची चौकशी करा असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहे. आतापर्यंत तक्रारी येत असतानाही या मशिदींवर कारवाई का केली नाही असा सवालही राष्ट्रीय हरित लवादाने दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीला विचारला आहे. आता या मशिदींमधील ध्वनिप्रदूषणाची चौकशी होणार असून या आरोपात तथ्य आढळल्यास त्यांच्यावर कारवाईही करण्यात येणार आहे.
[amazon_link asins=’B07FTXJGQS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’364793aa-9d38-11e8-84c4-61331a5c611b’]