FASTag बाबत NHAI ने दिली नवी सुविधा, दूर होईल तुमची पैशांशी संबंधीत ही समस्या

नवी दिल्ली : नवीन वर्ष म्हणजे 1 जोनवारी 2021 पासून देशातील सर्व टोल प्लाझावर फास्टॅग अनिवार्य करण्यात येईल. फास्टॅगबाबत लोकांच्या समोर अनेक समस्या येत आहेत. यापैकी एक समस्या म्हणजे, त्यांना हे समजत नाही की, त्यांच्या फास्टॅग खात्यात बॅलन्स आहे किंवा नाही आणि आहे तर किती आहे. हीच समस्या दूर करण्यासाठी एनएचएआयने My FASTag App मध्ये नवीन फीचर चेक बॅलन्स स्टेटस जोडले आहे. अ‍ॅपचा वापर करणारांनी आपल्या वाहनाचा नंबर टाकल्यास त्यांना बॅलन्सची माहिती मिळेल. एखाद्या कारणामुळे टोल प्लाझा सर्व्हरवर टॅग अपडेट होत नसेल तरी सुद्धा फास्टॅग वापरणारे लोक आपल्या वाहनाच्या फास्टॅगचे स्टेटस सहज जाणून घेऊ शकतात.

हे नवे फीचर फास्टॅग वापरणारा आणि टोल ऑपरेटर दोघांसाठी उपयोगी ठरेल. दोन्ही पक्ष रियल टाइम बेसिसवर फास्टॅगचा बॅलन्स सहजपणे चेक करू शकतील. इतकेच नव्हे, फास्टॅग बॅलन्सने संबंधीत विवादांच्या समस्यांचे निराकरण सुद्धा केले जाईल. याशिवाय एनएचएआयने ब्लॅकलिस्टेड टॅगचा रिफ्रेश टाइमसुद्धा 10 मिनिटांनी कमी करून 3 मिनिटांचा करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून ईटीसी सिस्टममध्ये स्टेटस अपडेट व्हावे आणि टोलमध्ये सहजपणे पास करण्यासाठी अ‍ॅपमध्ये करंट स्टेटस दिसावा.

कलर कोडच्या रूपात फास्टॅग बॅलन्स स्टेटस
या अ‍ॅपमध्ये कलर कोडच्या रूपात फास्टॅग बॅलन्स स्टेटस जाणून घेता येईल. ग्रीन म्हणजे हिरव्या रंगाच्या कलर कोडचा अर्थ असेल की, फास्टॅग अ‍ॅक्टिव्ह आहे आणि यामध्ये योग्य रक्कम आहे. ऑरेंज म्हणजे नारंगी कलर कोडचा अर्थ असेल की, फास्टॅगमध्ये कमी रक्कम जमा आहे. तर, रेड म्हणजे लाल रंगाच्या कलर कोडचा अर्थ असेल की, फास्टॅग ब्लॅकलिस्टेड आहे.

40 हजार पीओएसद्वारे रिचार्ज करू शकता फास्टॅग
जर एखाद्या वाहनाचा फास्टॅग ऑरेंज कलर कोडमध्ये आहे, म्हणजे कमी रक्कम उपलब्ध आहे तर वापरकर्ता टोल प्लाझाच्या पॉईंट ऑफ सेल म्हणजे पीओएसवर ताबडतोब रिचार्ज करू शकतो. देशभरात 26 बँकांसोबत भागीदारी करून टोल प्लाझावर 40 हजार पेक्षा जास्त पीओएसची व्यवस्था केली गेली आहे. एनएचएआयचा दावा आहे की, या नव्या फीचरमुळे वाहन चालकांच्या वेळेत बचत होईल तसेच इंधन आणि पैशांची सुद्धा बचन होईल.

याचे रिचार्ज सोपे बनवण्यासाठी अनेक पर्याय, जसे भारत बिल भरणा प्रणाली (बीबीबपीएस), युपीआय, ऑनलाइन भरणा, माय फास्टॅग मोबाइल अ‍ॅप, पेटीएम, गुगल पे इत्यादीला सुद्धा सहभागी केले आहे. याच्या सोबत टोल प्लाझावरील पॉईंट ऑफ सेल्स (पीओएस) वर रोख रिचार्जची सुविधा 24 तास उपलब्ध असेल.