Job ! भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणात (NHAI) सिव्हिल इंजिनीअर्ससाठी नोकरीची संधी; 56 हजार पगार, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  लॉकडाऊनमुळे सगळीकडेच नोकऱ्यांवर संक्रांत आली आहे. अशा परिस्थितीत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणा-या सिव्हिल इंजिनीअर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) डेप्युटी मॅनेजरच्या पदासाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी कोणतीच परीक्षा घेतली जाणार नाही. थेट मुलाखथीच्या आधारे भरती केली जाणार आहे.

पदाचे नाव –  डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल-सिव्हिल)
पदसंख्या  – 41
वेतन –  56, 100 रुपये मासिक तसेच अन्य भत्ते

कसा कराल अर्ज?

या भरतीसाठी NHAI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज भरण्याची करण्याची प्रक्रिया 29 एप्रिल 2021 पासून सूरू झाली असून अंतिम तारीख 28 मे 2021 आहे. यासाठी कोणतेही अर्ज शुल्क लागणार नाही. ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशन फॉर्मची लिंक दिली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.

आवश्यक पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन डिग्री आवश्यक. ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (GATE) चा वैध स्कोअर. कमाल वयोमर्यादा 30 वर्षे. आरक्षित वर्गांसाठी कमाल वयोमर्यादेत सूट दिली आहे. भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. रिक्त पदांवर योग्य उमेदवारांची निवड त्यांचा गेट स्कोअर आणि मुलाखतीच्या आधारे घेतला जाणार आहे.