खुशखबर ! राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 6521 रिक्त जागांवर भरती सुरु, जाणून घ्या प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरस साथीच्या दरम्यान राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत वेगवेगळ्या पदांवर भरती करण्यात येणार आहे. यात वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल व्यवस्थापक, फिजिशियन, कर्मचारी नर्स, क्ष-किरण तंत्रज्ञ, ई तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, भूल देणारे डॉक्टर, फार्मासिस्ट, स्टोअर अधिकारी, डाटा एंट्री ऑपरेटर, वार्ड बॉय पदांचा समावेश असून एकूण ६५२१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हे अर्ज ऑनलाईन अर्थात ई- मेल पद्धतीने मागविण्यात येणार आहेत. दरम्यान, या विविध पदांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख उद्या (१८ एप्रिल २०२०) आहे.

एकूण पद संख्या – ६५२१ जागा
शैक्षणिक पात्रता – विविध पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता
नोकरी ठिकाण – लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड
अर्ज करण्यची शेवची तारीख – १८ एप्रिल २०२०