परभणीत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत विविध पदांवर 59 जागांसाठी ‘भरती’, जाणून घ्या अर्ज ‘प्रक्रिया’

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – वैद्यकीय क्षेत्रात काम करु इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) परभणीअंतर्गत विविध पदांवर 59 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार 24 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करु शकतात.

पद आणि जागा –
समुपदेशक – 9 जागा
दंत तंत्रज्ञ – 1 जागा
सांख्यिकीय अन्वेषक – 1 जागा
मानसशास्त्र तज्ञ – 2 जागा
वैद्यकीय अधिकारी – 7 जागा
फार्मासिस्ट – 7 जागा
लॅब तंत्रज्ञ – 1 जागा
पर्यवेक्षक – 5 जागा
लेखापाल – 2 जागा
ब्लॉक कम्युनिटी मोबिलायजर – 2 जागा
फिजिओ थेरपिस्ट – 2 जागा
पॅरामेडिकल वर्कर – 2 जागा
फिजीशयन सल्लागार औषध – 2 जागा
स्त्रीरोगतज्ञ – 3 जागा
ऑन्कोलॉजिस्ट – 1 जागा
नेफरोलॉजिस्ट – 1 जागा
हृदयरोग तज्ज्ञ – 1 जागा
डेंटल हायजिनिस्ट – 1 जागा
आयुष वैदकीय अधिकारी – 2 जागा
ऑडिओलॉजिस्ट – 1 जागा
डीईआयसी व्यवस्थापक – 1 जागा
आयुष मसाजिस्ट कम अटेंडट – 1 जागा
ब्लड बँक तंत्रज्ञ – 4 जागा
आयुष एमओ युनानी – 1 जागा

शैक्षणिक पात्रता –
वरील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे त्या त्या क्षेत्रातील पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

शुल्क –
या पदांसाठी अर्ज करण्याचे शुल्क 150 रुपये आहे (मागासवर्गीय – 100 रुपये)

वेतनमान –
17,000 ते 1,25,000 रुपये

नोकरीचे ठिकाण – परभणी

अर्ज पाठविण्याचा पत्ता –
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम, प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, सामान्य रुग्णालय, परभणी या पत्त्यावर आपला अर्ज पाठवू शकतात.

अर्जदार या https://parbhani.gov.in/ वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 फेब्रुवारी असणार आहे. यासाठीची संपूर्ण जाहिरात या https://cdn.s3waas.gov.in/s39cf81d8026a9018052c429cc4e56739b/uploads/2020/02/2020021259.pdf लिंकमध्ये देण्यात आली आहे. अर्जदारांनी ही सूचना वाचून आपले अर्ज करावेत. अर्जाची प्रत या लिंकमध्ये उपलब्ध आहे. हा अर्ज भरून तो योग्य त्या पत्यावर अंतिम तारखेपूर्वी पाठवावा.