सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, थेट मुलाखत घेऊन होणार 6310 पदांची भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थान सरकारने 6000 हजाराहून अधिक पदांसाठी सरकारी भरती काढली आहे. त्याअंतर्गत सामुदायिक आरोग्य अधिकारी पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र व इच्छुक उमेदवार या पदासांठी अर्ज करु शकतात. भरती संबंधित अधिकृत अधिसूचनेनुसार उमेदवार 16 सप्टेंबरपर्यंत अर्ज करु शकतात. या भरती प्रक्रिये अंतर्गत मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. यासाठी कोणतीही लेखी किंवा संगणक आधारित परीक्षा घेतली जाणार नाही.

एनएचएम राजस्थान सीएचओ भरती 2020 अंतर्गत सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्याच्या एकूण 6310 रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये टीएसपी पदासाठी 1014 आणि टीसएसपी नसलेल्या पदांसाठी 5269 भरती काढण्यात आली आहे. एनएचएम राजस्थान भरती 2020 अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 25 हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे.

पात्रता

या भरतीसाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील सामुदायिक आरोग्य किंवा नर्सिंगमध्ये बीएससी असणे आवश्यक आहे. त्याशिवाय जीएनएम किंवा बीएएमएस केलेले उमेदवार देखील यापदांसाठी अर्ज करु शकतात.

वयोमर्यादा

या भरतीसाठी 18 ते 45 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करु शकतात. अर्जदारांचे वय 1 जानेवारी 2020 रोजी मोजले जाईल.

अर्जाची फी

एनएचएम राजस्थान भरती 2020 साठी सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना अर्ज फी म्हणून 400 रुपये द्यावे लागतील. तर ओबीसी,एमबीसी,एससी,एसटी प्रवर्गाच्या उमेदवारांना 300 रुपये फी द्यावी लागेल. या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज फी भरली जाऊ शकते.