पदवीधारकांना सरकारी नोकरीची संधी ! राष्ट्रीय आरोग्य विभागात होणार मोठी भरती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  (NHM Ratnagiri Recruitment 2021) कोरोनाच्या महामारीत देखील पात्र उमेदवारांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये (NHM) नोकरी करण्याची एक खास संधी येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानात रत्नागिरी येथे १६६ विविध आरोग्यविषयक पदासाठी भरती होणार आहे. यासाठी पदवीधारकांनी रत्नागिरी प्रशासनाच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करायचा आहे.

असा करा अर्ज –

रत्नागिरी प्रशासनाच्या वेबसाइटवर जाऊन तेथील भरती सेक्शनमध्ये ‘Recruitment for Covid-19 ‘च्या लिंकवर क्लिक करणे. हे केल्यावर त्याबाबत जाहिरात ओपन होईल. तसेच जाहिरात डाउनलोड करू शकतो. Application form जाहिरातीतच दिला आहे. तो अर्ज भरून विचारलेली कागदपत्रे जोडून जाहिरातीत नमूद केलेल्या मेलद्वारे सुपूर्द करायचे आहे.

पदे, जागा, आणि पदानुसार शैक्षणिक पात्रता –

फिजिशियन – ६, MD मेडिसीनची पदवी,
एनेस्थिसियोलॉजिस्टच्या – १५, MD,DA आणि DNB, पदवी,
माइक्रोबॉयोल जिस्ट – २, माक्रोबॉयोलॉजीमध्ये MD पदवी,
मेडिकल ऑफिसर – १५ MBBS degree
आयुष मेडिकल ऑफिसर – १२ BAMS or BUMS or BDS पदवी,
स्टाफ नर्स – १०० B.Sc. नर्सिंगची पदवी,
लॅबोरेटरी टेक्निशियन – १६ BSc DMLT पदवी.

अर्ज करण्याची अंतिम तारीख –

३१ मे २०२१.