पुण्यात NIA ची मोठी कारवाई, दोघांना अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – देशात दहशतवादी कारवाया घडविण्याचा कट पुण्यात रचला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एनआयएने पुण्यातून अटक केलेल्या ते दोघे हा कट रचत होते, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या कारणावरुन रविवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) येरवडा व कोंढवा भागातून महिलेसह दोघांना अटक केले होते.

नबील एस खत्री (वय २७, रा. कोंढवा) व सादिया अन्वर शेख (वय २२, रा. पुâलेनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.एनआयएच्या माहितीनुसार, नबील खत्री पुण्यात व्यायामशाळा (जिम ट्रेनर) चालवित होता. तर सदिया शेख बारामती येथे एका महाविद्यालयात पत्रकारितेच्या (मास कम्युनिकेशन्स अँड जर्नालिझम) दुसऱ्या वर्षांत शिक्षण घेत होती. इसिसच्या दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेल्या आयएसकेपीशी संबंध असल्यामुळे दिल्ली पोलिसांनी ८ मार्चला कश्मिरी दाम्पत्याला अटक केली होती. जहांजईझीब सामी वानी आणि त्यांची पत्नी हिना बशीर बेग अशी त्यांची नावे आहेत. हे दाम्पत्य विध्वंसक आणि देशविरोधी कार्यात सहभागी असल्याचे एनआयएला आढळून आले.

तसेच आयएसआयएस अबू दाभी मॉडयूल प्रकरणी तिहार तुरूंगात कैदी असलेला अब्दुल्ला बासिथ याच्याशी त्यांचा संपर्क असल्याचेही निष्पन्न झाले होते.आरोपी सादिया शेख हे जहांझीब सामी, हिना बशीर बेग आणि अब्दुल्ला बासिथ यांच्याशी सतत संपर्क साधत असल्याचे एनआयएच्या तपासात निष्पन्न झाले आहे. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून सादिया इसिसमध्ये तरुणांना भरती करण्यासाठी संपर्कात असल्याचेही उघड झाले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखत असताना जम्मू-काश्मीर पोलिसांनी २०१८ मध्ये ताब्यात घेतले होते. आरोपी नबील खत्री, जहानजेब सामी आणि अब्दुल्ला बासिथ यांना शस्त्रे खरेदी, बनावट सिमकार्ड मिळविण्याची व्यवस्था करून भारतात दहशतवादी हल्ले करण्याच्या योजनेत सक्रियपणे सहभागी असल्याचेही समोर आले आहे. आयएसआयएसच्या विचारधारेचा प्रचार कसा करायचा, भारतातील दहशतवादी कारवाया कशारितीने वाढवायच्या, दहशतवादी कारवायांसाठीr तरुणांची भरती करून हिंदुस्थानात इसिसची केडर उभारण्याचा प्रयत्न करीत होते. आयएसआयएसच्या कारवायांना पुढे आणण्यासाठी सुधारित स्फोटक उपकरण आणि वेगवेगळ्या सुरक्षित मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर ते जहानजेबशी सतत संपर्कात होते. अटक केलेल्या दोघांना नवी दिल्ली येथील एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे, असे सांगण्यात आले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like