आयसिसच्या दोन दहशतवाद्यांना हैदराबादमध्ये बेड्या 

हैद्राबादः वृत्तसंस्था
आयसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेत काम करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना हैद्राबादमधून अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सदरची कारवाई केली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे यापूर्वी देखील शहरातील हाफजबाबा नगर परिसरात राहणाऱ्या बासिथला यापूर्वी 2014 आणि 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. अब्दुल्ला बासिथ (वय 24) आणि अब्दुल कादीर (वय-19) अशी दोघांची नावे आहेत.
 [amazon_link asins=’B07B9SMJ19′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a87cbebf-9eca-11e8-9732-cb170ca7c42b’]
आयसिसशी संबंध असल्याच्या संशयातून एनआयएने हैद्राबादमधील सात ठिकाणांवर नुकताच छापा टाकला होता. यावेळी संशयातून आठ जणांची चाैकशी करण्यात आली असता बासिथ आणि अब्दुल कादीर या दोघांचा समावेश होता. या दोघांचा दहशतवादी संघटना आयसिसशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. भारतात दहशतवादी कारवायांचा कट रचने, आयसिससाठी नवीन तरुणांची भरती करणे या आरोपाखाली त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती एनआएचे महानिरीक्षक अलोक मित्तल यांनी दिली.
[amazon_link asins=’B07D77V1DX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f25630e9-9ec9-11e8-8194-5189739d8b51′]