NIAची कारवाई : ISISशी संबंध असल्याच्या संशयावरून केरळचे 3 युवक ताब्यात

नवी दिल्‍ली : वृत्‍तसंस्था – राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केरळमधील 3 युवकांना ताब्यात घेतले असुन त्यांच्याकडे सखोल चौकशी करण्यात येत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी दोघे कासरगोड जिल्हयातील आहेत तर एकजण पलक्‍कडचा रहिवाशी आहे. आयएसआयएस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून तिघांच्या घरावर छापे टाकुन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सन 2016 मधील आयएसआयएस कासरगोड मॉडयूल प्रकरणी एनआयएने हे छापे टाकल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. कासरगोड येथील अनेक युवक प्रभावित होवुन आयएसआयएसमध्ये सामील होण्याकरिता अफगाणिस्तानात गेल्याचे बोलले जाते.
आज ताब्यात घेण्यात आलेल्यांची एनआयएच्या हेड क्‍वार्टरमध्ये कसून चौकशी सुरू आहे तर कासरगोड येथे राहणार्‍या अहमद आणि अबू बकर याला सोमवारी (दि.29) कोच्ची येथील एनआयएच्या कार्यालयात हजर राहण्याबाबत समन्स बजाविण्यात आले आहे. दरम्यान, एनआयएने टाकलेल्या छाप्यांमध्ये वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू जाकीर नाईकच्या भाषणाच्या काही कॅसेट, इतर डीव्हीडी आणि सीडीही सापडल्या आहेत. एनआयएने मल्याळम भाषेतील काही नोट्स, पेन ड्राइव्ह, मेमरी कार्ड्स, मोबाईल आणि सिम कार्ड देखील जप्‍त केली आहेत.

witter.com/ANI/status/1122441015670071296