अंबानींच्या घरासमोरील स्फोटके प्रकरण : ‘ती’ पांढरी इनोव्हा गाडी सापडली

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटिन गाड्यांनी भरलेली गाडी ठेवून दुसर्‍या ज्या गाडीतून हल्लेखोर निघून गेले होते, ती पांढरी इनोव्हा गाडी शोधण्यात एनआयएच्या पथकाला यश आले आहे. सध्या ही गाडी एनआयएच्या मुंबईच्या कार्यालयात ठेवण्यात आली आहे. ठाण्यातील एका व्यावसायिकाची ही गाडी असल्याचे सांगण्यात येते.

जिलेटिन कांड्या असलेली गाडीही ठाण्यातील मनसुख हिरेन यांची असल्याचे निष्पन्न झाले होते. या संबंधातील कटात ५ ते ७ जणांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

या इनोव्हा गाडीतून जाणारे दोन्ही चालक आणि एका व्यावसायिकाला अटक केली जाऊ शकते. ही गाडी सापडल्याने या प्रकरणातील मोठे धागेदोरे एनआयएच्या पथकाला लागले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातूनच सचिन वाझे हे स्फोटके ठेवलेल्यांशी संपर्कात होते, असा आरोप केला जात आहे.