NIA चा खुलासा, ‘हदिया’ केसमध्ये बड्या वकिलांना मिळाले होते पैसे, समोर आला ‘लेखा-जोखा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशामध्ये अनेक ठिकाणी सीएए विरोधात जोरदार आंदोलने सुरु आहेत अशात एनआयए ने एक मोठा खुलासा केला आहे. पीएफआयच्या बँक खात्यामधून देशातील अनेक मोठ्या वकिलांना पैसे दिले गेले असल्याचे समोर आले आहे. या वकिलांमध्ये कपिल सिब्बल, दुष्‍यंत दवे आणि इंदिरा जयसिंह सारख्या मोठ्या वकिलांचा समावेश आहे.

या आरोपांना फेटाळून लावत सिब्बल यांनी हे सर्व बकवास असल्याचे म्हंटले आहे. कपिल सिब्बल म्हणाले की, जपीएफआय माझा क्लाईंट आहे जे पैसे मला मिळाले आहेत ते हदिया केससाठी मिळाले असल्याचे देखील सिब्बल यांनी स्पष्ट केले आहे. तसेच दवे यांनी देखील वकिलांना आपल्या कामासाठीच फीज मिळत असल्याचे सांगितले. माझ्यासाठी याचे काहीच महत्व नाही मी अप्लसख्यांकांसाठी लढताच राहणार असल्याचे दवे यांनी सांगितले आहे.

अ‍ॅडव्होकेट इंदिरा जयसिंग यांनी पीएफआयकडून पैसे घेतल्याचा दावा फेटाळून लावला असून आपली प्रतिमा करणाऱ्यांवर आणि माध्यमांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.

हदिया केस
यासंदर्भात एनआयएच्या तपासणीमध्ये असे दिसून आले आहे की कपिल सिब्बल, दुष्यंत दवे आणि इंदिरा जयसिंग यांना अनुक्रमे 77 लाख, 11 लाख आणि 4 लाख रुपये इतकी रक्कम पीएफआयने दिली. हे पैसे पीएफआयने हदिया प्रकरणात दिले आहेत. मात्र, एफआयए स्वतः या प्रकरणात एक पक्ष नव्हता.

अखिलाने इस्लाम कबूल केला होता आणि हदिया बनली होती कारण तिने पीएफआय कार्यकर्ता शफीन जहाँ सोबत विवाह केला होता. केरळमधील एक संस्था आहे जी इस्लाम कबुल करणाऱ्यांना धार्मिक महत्व शिकवतो या संस्थवर अनेकदा छापे देखील टाकण्यात आलेले आहेत. हदिया केस सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली होती.

यात पीएफआयने याचिकाकर्ते शफिन जहां यांच्या वतीने या वकिलांना पेमेंट दिले होते. हे पैसे पीएफआयने हदिया प्रकरणात दिले होते. जरी पीएफआयचा याच्याशी थेट संबंध नव्हता तरीदेखील.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
लव जिहादचे हदिया प्रकरण संबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देत तिचा विवाह रद्द करण्याचा निर्णय रद्द केला होता. तसेच सर्वोच्च न्यायालयाने हे देखील सांगितले होते की या प्रकरणी एनआयए तपास सुरु ठेऊ शकते कारण या आधी तपासासाठी एजन्सीने हे सांगितले होते की केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर असे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा