NIA Raid On PFI |  टेरर फंडिंग आणि कॅम्प चालवल्या प्रकरणी 10 राज्यातून 100 हून अधिक अटकेत, PFI विरुद्ध NIA ची मोठी कारवाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – NIA Raid On PFI |  राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया (PFI) आणि त्याच्याशी संबंधित लिंकवर देशभरात अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. टेरर फंडिंग (Terror Funding) आणि कॅम्प चालवण्याच्या (Camps) आरोपांखाली एनआयएने ही छापेमारी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून एनआयएने या प्रकरणात डझनहून अधिक गुन्हे (FIR) दाखल केले आहेत. यामध्ये PFI संबंधित काही धागेदोरे सापडले (NIA Raid On PFI) आहेत. ईडी, एनआयए आणि राज्य पोलिसांनी PFI संबंधित 100 हून अधिक जणांना वेगवेगळ्या प्रकरणात बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये PFI चा प्रमुख परवेझ अहमद (PFI Chief Parvez Ahmed) याचाही समावेश असून त्याला NIA ने दिल्लीतून अटक (Arrest)  केली आहे.

एनआयएने केरळ (Kerala), तेलंगणा (Talangana), कर्नाटक (Karnataka), तामिळनाडू (Tamil Nadu), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) यासह अनेक राज्यांमध्ये PFI आणि त्याच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी (NIA Raid On PFI) केली. एनआयएला मोठ्या प्रमाणात PFI  आणि त्याच्याशी संबंधित लोकांच्या संशयास्पद हालचाली ची माहिती मिळाली होती. त्याच आधारावर ही कारवाई करण्यात आली. 10 पेक्षा जास्त राज्यात ईडी (ED), एनआयए आणि राज्य पोलिसांनी (State Police) शंभर पेक्षा जास्त लोकांना अटक केली. पीएफआयशी संबंधित लोकांच्या प्रशिक्षणाच्या हालचाली, टेरर फंडिंग आणि लोकांना संघटनेशी जोडण्याविरोधातील ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

एनआयएने दिल्लीतील शाहीन बाग (Shaheen Bagh) आणि गाझीपूर (Ghazipur) येथून PFI संबंधित लोकांना अटक केली आहे. तसेच लखनौमधील इंदिरानगर येथून दोन जणांना अटक केली.
तर आसाम पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, या कारवाईविरोधात पीएफआयने प्रतिक्रिया दिली आहे. संघटनेचे सरचिटणीस अब्दुल सत्तार
(General Secretary Abdul Sattar) यांनी सांगितले की, फॅसिस्ट सरकारकडून विरोधकांचा आवाज
दाबण्यासाठी एजन्सीचा वापर केला जात आहे.
सरकारकडून करण्यात येत असलेल्या अत्याचारांचं ताजं उदाहरण रात्री पहायला मिळालं.
यंत्रणांनी लोकप्रिय नेत्यांच्या घरावर छापेमारी केली आहे.

Web Title :- NIA Raid On PFI | 10 states dozens of crimes over 100 arrests nia crackdown against pfi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | वीज कट केल्याने महावितरणच्या अधिकार्‍याला बेदम मारहाण, केले फ्रॅक्चर

Viral Video News | हॉटेलमध्ये GF सोबत रोमान्स करताना रंगेहाथ पकडून पत्नीकडून पतीला मारहाण

Modi Govt – Logistics Park | मोदी सरकारकडून मराठवाडा-विदर्भासाठी मोठे गिफ्ट, लॉजिस्टिक पार्कच्या ड्रीम प्रोजेक्टचा करार झाला फायनल