NIA चा खुलासा : बांगलादेशची एक गँग लंडनमध्ये शिकत असलेल्या भारतीय मुलींचे करतेय ‘ब्रेन वॉश’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – लंडनमध्ये शिकत असलेल्या भारतीय मुलींना रॅडिकलाइज करण्याचे प्रकरण समोर आले आहे. एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) च्या सूत्रांनुसार लंडनमध्ये सध्या एक बांगलादेशी गँग सक्रिय आहे, जी तेथे शिकत असलेल्या भारतीय मुलींचे धर्म परिवर्तन करत आहे. ही गँग त्या मुलींना वादग्रस्त इस्लामिक उपदेशक झाकिर नाईकचा व्हिडिओ दाखवते आणि धर्म परिवर्तनासाठी ब्रेन वॉश करते.

गृह मंत्रालयाने याप्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश जारी केले आहेत. गृह मंत्रालयाच्या कागदपत्रांनुसार एक बांगलादेशी युवक नफीसने चेन्नईची मुलगी हर्षिता बैद, जी लंडनमध्ये शिकण्यासाठी गेली होती, तिला फुस लावून तिचे धर्म परिवर्तन केले आहे. हर्षिता बैदकडून त्याने इस्लाम धर्म कुबूल करून घेतला.

एनआयए सूत्रांनुसार, चेन्नईच्या हर्षिता बैदला बांगलादेशी युवक नफीसने वादग्रस्त इस्लामिक उपदेशक झाकिर नाईक आणि मुळ पाकिस्तानी इस्लामिक धर्मगुरु यासिर काही (काजी) चे व्हिडिओ दाखवून रॅडिकलाइज केले आहे. एनआयएनुसार बांगलादेशी युवकाने हिंदू मुलगी हर्षिता बैदचे अपहरण केले आहे आणि आता पैसे वसूल करण्यासाठी धमकी देत आहे.

गृह मंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे. एनआयए आता संपूर्ण प्रकरणात एफआयआर दाखल करून लंडनमध्ये शिकण्यासाठी गेलेल्या भारतीय मुलींना रॅडिकलाइज करणे आणि त्यांचे धर्म परिवर्तन करण्याच्या प्रकरणाचा तपास करणार आहे.

सूत्रांनुसार एनआयएने भारतीय मुलींना रॅडिकलाइज करणार्‍या या अंतरराष्ट्रीय ग्रुपचा पर्दाफाश केला आहे.