दिल्लीतील सोने तस्करप्रकरणी सांगली जिल्ह्यात छापे ! NIA चे 10 जणांचे पथक, एकाची कसून चौकशी

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर सोन्याची तस्करी करताना आठजणांना अटक करण्यात आली आहे. ते आठही जण सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्‍यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर सीमा शुल्क विभाग, केंद्रीय जीएसटी यांच्या संयुक्त पथकाने आटपाडी तालुक्‍यात छापे टाकण्यात आले होते. याप्रकरणी गुरुवारी एनआयए च्या दहा जणांच्या पथकाने खानापूर तालुक्‍यात छापे टाकले. तालुक्‍यातील एकाची कसून चौकशी केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. मात्र, याबाबतची अधिक माहिती समजू शकली नाही.

28 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील रेल्वे स्थानकावरुन 8 जणांकडून वरून 42.89 कोटी रुपयांचे 83.624 किलो वजनाची 504 सोन्याची बिस्किटे “डीआरआय’ने जप्त केली होती. आठही संशयित सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्‍यातील असल्याचे स्पष्ट झाले होते. संशयितांनी म्यानमार येथून मणिपूरच्या सीमेवरून सोन्याची तस्करी केल्याचे तपासात स्पष्ट झाले होते.

संशयित नेहमीच या मार्गाने सोने तस्करी करीत असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्या दृष्टीने तपास सुरू आहे. दरम्यान याप्रकरणी आज “एनआयए’चे दहा जणांचे पथक सांगलीत दाखल झाले. तालुक्‍यातील एकास चौकशीसाठी ताब्यात घेतले. शिवाय अटक केलेल्या आठ संशयितांमागे असणाऱ्या सूत्रधाराचा शोध घेतला जात आहे. त्यातून सोने तस्करी करणाऱ्यांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

You might also like