देशात दहशतवादी हल्ल्याचा धोका ! NIA कडून महाराष्ट्राला अलर्ट !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम रद्द केल्यानंतर दहशतवादी संघटनांकडून देशामध्ये दहशतवादी हल्ल्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सोमवारी (दि. 14) देशावर असलेल्या दहशतवादाच्या कटाची माहिती दिली. जमात-उल-मुजाहिदीन (JMB) सारख्या दहशतवादी संघटना बंगालपासून काश्मीर आणि काश्मीरपासून केरळपर्यंत दहशतवादी हल्ल्याच्या प्रयत्नात आहे. दहशतवाद विरोधी पथकांच्या सर्व राज्यांच्या प्रमुखांच्या बैठकीत एनआयएने ही माहिती दिली.

एनआयए चे महासांचालक वाय. सी. मोदी यांनी सांगितले की, जमात-उल-मुजाहिदीन सारख्या दशतवादी संघटना महाराष्ट्र, केरळ, बिहार आणि झारखंड या राज्यांमध्ये बांगलादेशमधील प्रवाशांच्या आडून दहशतवादी कृत्य करण्याच्या प्रयत्नात आहेत. मागील काही दिवासांत एनआयएने आयएस कनेक्शन संबंधित 127 जणांना अटक केली होती. हे सर्व झाकीर नाईकच्या भाषणाचे प्रभावित झाल्याने मोदी यांनी सांगितले. तसेच पाकिस्तानकडून पंजाबमध्ये पुन्हा एकदा खलिस्तान दहशतवाद्यांना मदत करण्याचा प्रयत्न सुरु असून पाकिस्तान खलिस्तानि दहशतवाद्यांच्या मदतीने पंजाबमध्ये दहशत पसरवण्याच्या प्रयत्नात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांना भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तांकडून फंड मिळत असल्याची माहिती व्हाय.सी. मोदी यांनी दिली.

श्रीलंकेतील चर्च हल्ला –
एनआयएचे महानिरीक्षक मित्तल म्हणाले, केरळ आणि तामिळनाडूनध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींनी जहरान हशमीचे व्हिडीओ आणि ऑडिओ भाषण ऐकले होते. जहरान हाच श्रीलंकेतील चर्चमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. सीरियामध्ये ISIS या दहशतवादी संघटेशी संबंधीत असललेल्या 127 जणांना अटक करण्यात आली. त्यापैकी 33 जण तामिळनाडूतील, 19 उत्तर प्रदेश, केरळ 17, तेलंगणामधील 14 जणांचा समावेश असून या सर्वांनी झाकीर नाईकची ऑडिओ क्लिप ऐकल्याचे मित्तल यांनी सांगितले.

जमात-उल-मुजाहिदीन नेटवर्क –
म्यानमारमधून पळालेल्या रोहिग्यां मुस्लिमांनी बांगलादेशी दहशतवादी संघटना जमात-उल-मुजाहिदीनच्या माध्यमातून भारतात कारवाई सुरु केल्याचा खुलासा एनआयएने केला. वर्धमान प्रकरणात ऑक्टोबर 2014 मध्ये या संघटनेचे पहिले कनेक्शन सापडले. चौकशी दरम्यान या संघटनेचे प्रमुख 2007 पासून भारतात येत असल्याचा खुलासा झाला होता. या बैठकीमध्ये एनआयएने जमात-उल-मुजाहिदीनच्या नेतृत्वाच्या संपर्कात असणाऱ्या 125 जणांची यादी दहशतवाद विरोधी पथकांना दिली आहे. या बैठकिला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते.

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी