लाल आउटफिटमध्ये ब्राईडल लुकमध्ये दिसली निया शर्मा !

पोलिसनामा ऑनलाईन – टीव्ही अ‍ॅक्ट्रेस निया शर्मा अभिनय नाही तर आपल्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. निया युथमध्ये खूपच फेमस आहे. जेव्हा फॅशन इंडस्ट्रीबद्दल बोललं जातं तेव्हा नियाचं नाव येणार नाही असं होतच नाही. निया आपल्या हॉट लुकमुळेही अनेकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिचे अनेक बिकीनीतले हॉट फोटो सोशलवर व्हायरल झाले होते. पुन्हा एकदा नियानं सोशलवर आपल्या लुकमुळं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

नियानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या चर्चेत आले आहेत. या फोटोची खासियत अशी की या फोटोत नियानं साडी घातली आहे. रेड अँड व्हाईट आउटफिटमध्ये निया खूपच सुंदर दिसत आहे. नियाचे एक्सप्रेशन नेहमीप्रमाणे लक्ष वेधून घेत आहेत. चाहत्यांना तिचा अवतार खूप आवडला आहे. नियाचे हे ब्राईडल लुकमधील फोटो सध्या सोशलवर व्हायरल होत आहेत.

https://www.instagram.com/p/CCiUAmPl-pP/

नियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, 2010 साली आलेल्या काली : एक अग्निपरीक्षा या मालिकेतून तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. एक हजारों में मेरी बहना है आणि जमाई राजा या मालिकांनी तिला खूप लोकप्रियता मिळाली आहे. नागिन 4 मालिकेतही तिनं काम केलं आहे. फियर फॅक्टर, खतरों के खिलाडी सिजन 8 मध्ये निया दिसली होती. याशिवाय नियानं ट्विस्टेड(Twisted) या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.

https://www.instagram.com/p/CCVuWYgl7cR/

https://www.instagram.com/p/CAuSGnwlByV/

https://www.instagram.com/p/B_4SHsTlhL6/

https://www.instagram.com/p/B-yqy86F2VX/