अभिनेत्री निया शर्मानं ‘कोका कोला’ गाण्यावर केला ‘SEXY’ डान्स ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्ही अभिनेत्री निया शर्मा अभिनय नाही तर, आपल्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. निया युथमध्ये खूपच फेमस आहे. जेव्हा फॅशन इंडस्ट्रीबद्दल बोललं जातं तेव्हा, नियाचं नाव येणार नाही असं होतच नाही. निया आपल्या हॉट लुकमुळेही अनेकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिचे अनेक बिकीनीतले हॉट फोटो सोशलवर व्हायरल झाले होते. पुन्हा एकदा निया आपल्या डान्स व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.

नियाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत निया कोका कोला तू या गाण्यावर सेक्सी डान्स करताना दिसत आहे. रेड कलरच्या शिमर ड्रेसमध्ये निया खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येत आहे की, हा एका शुटींगचा व्हिडीओ आहे.

बी टाऊनमध्ये फेमस असणारी निया शर्मा सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. आपले अनेक बोल्ड आणि सेक्सी फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशलवर लाखो लोक नियाला फॉलो करतात.

नियाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर फियर फॅक्टर, खतरों के खिलाडी सिजन 8 मध्ये निया दिसली होती. याशिवाय नियानं ट्विस्टेड(Twisted) या वेब सीरिजमध्येही काम केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/