home page top 1

प्रियंका चोप्रा आणि निक जोनासनं पंजाबी गाण्यावर लावले ‘ठुमके’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली वृत्तसंस्था – निक जोनासचा 27 वा वाढदिवस अत्यंत खास पद्धतीने साजरा झाला. देसी गर्ल प्रियंका बरोबर विवाहनंतर निकचा हा पहिलाच वाढदिवस आहे. प्रियंकाने हा क्षण आठवणीत राहावा यासाठी कोणतीही संधी सोडली नाही. तिने निकसाठी ना की फक्त अनोखे सरप्राइज दिले तर सोशल मिडियावर एक रोमाँटिक व्हिडिओ शेअर केला. याशिवाय सोशल मिडियावर एक इनसाइड व्हिडिओ व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये दिसते की प्रियंका निकला देसी रंगावत रंगवत आहे. म्हणजेच घरच्या पार्टीत ती बॉलिवूडच्या गाण्यावर निक बरोबर डान्स करत आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडिओ निकच्या भावाने केविन जोनासची पत्नी डॅनिअल जोनासला शेअर केला. यात निक आणि प्रियंका बॉलिवूडमधील सिंघम सिनेमामधील अजय देवगणचे गाणे हौली हौली गिद्दे विच वर डान्स करत आहे. यात दिसते की निक प्रियंकाची स्टाइल कॉपी करत आहे आणि डान्स करत आहे. परंतू लगेचच थांबतो. तर प्रियंका निकच्या स्टाइलवर हसत डान्स करत आहे. एवढेच नाही तर इन्स्टाग्रामवर कमेंट करत तिने अमेजिंग बरोबरच हाहा असे ही लिहिले आहे. >
हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीला उतरला आहे. काहीने निकवर मजेशीर कमेंट देखील केली आहे. एका यूजरने लिहिले की, निकला डान्स करता येत नाही परंतू आम्हाला तो आवडतो. एका यूजरने लिहिले की, तो खूप छान आहे, प्रत्येक व्यक्तीला तो आवडतो.

 

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like