‘पॉप सिंगर’ निकी मीनाज लवकरच होणार आई ! ‘बेबी बंप’मधील फोटो शेअर करत दिली Good News !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अमेरिकन रॅपर आणि पॉप सिंगर निकी मिनाज सध्या चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे तिचे बेबी बंपमधील फोटो आहेत. निकी सध्या प्रेग्नंट आहे. तिचे बेबी बंपमधील काही फोटो सध्या सोशलवर चर्चेत आहेत. निकीनं स्वत: चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.

View this post on Instagram

And finally, the Virgin Mary by #DavidLaChapelle 🙏

A post shared by Barbie (@nickiminaj) on

निकीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहे. यात ती तिचं बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. तिन हे फोटो शेअर करत चाहत्यांसोबत तिची गुड न्यूज शेअर केली आहे. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. केनेथ पेटी असं तिच्या पतीचं नाव आहे. दोघंही आपल्या बाळासाठी खूप खुश आहेत.

निकीचे हे फोटो सध्या सोशलवर झपाट्यानं व्हायरल होत आहेत. अनेकांनी तिच्या फोटोंवर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

निकी मीनाजबद्दल थोडक्यात…

निकी मीनाज ही फेमस अमेरिकन रॅपर आणि पॉप सिंगर आहे. 2011 ते 2016 या काळात ती 10 वेळा ग्रॅमी अवॉर्डसाठी नॉमिनेट झाली होती. 2012 मध्ये तिनं पहिला ग्रॅमी अवॉर्ड मिळवला होता.

View this post on Instagram

#Preggers 💛

A post shared by Barbie (@nickiminaj) on