समलिंगी महिला अधिकारांसाठी जगप्रसिध्द ‘रॅपर’ निकी मिनाजकडून ‘सौदी अरब’चा शो रद्द, पुढं झालं ‘असं’ काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अमेरिकन रॅपर निकी मिनाजने सौदी अरबमधील आपला एक लाईव्ह परफॉर्मंस रद्द केला आहे. तिने हा निर्णय सौदी अरब मधील महिला आणि समलिंगींच्या अधिकारांसाठी घेतला आहे. मिनाज पुढील आठवड्यात जेद्दाच्या एका कल्चरल फेस्टीवलचा हिस्सा बनणार होती. सौदी अरबमध्ये महिलांच्या प्रति रुढीवादी विचार असल्याने सोशल मीडियावर निकी मिनाजवर टीका होताना दिसत आहे.

शुक्रवारी न्यूयॉर्क बेस्ड मानवाधिकार फाउंडेशनने मिनाजला एक पत्र लिहिलं होतं. तिला आवाहन केलं होतं की, तिने या फेस्टीवलला बॉयकॉट करावं आणि आपल्या ग्लोबल प्रभावाचा वापर करत सौदी अरबच्या महिला अॅक्टीव्हिस्ट्सची जेलमधून मु्क्ततेची मागणी करावी.

शोबद्दल अशी प्रतिक्रिया आल्यानंतर निकी मिनाज म्हणाली की, “मी सौदी अरबमध्ये माझ्या चाहत्यांसाठी एक शानदार परफॉर्मंस द्यायचा होता. परंतु अनेक मुद्द्यांवर स्वत:ला एज्युकेट केल्यानंतर मी निर्णय घेतला आहे की, मी जेद्दा फेस्टीवलचा हिस्सा बनणार नाही. मला असं वाटतं की, मी महिला आणि एलजीबीटीक्यु समुदायाच्या अधिकारांना आणि फ्रिडम ऑफ एक्सप्रेशनला माझं समर्थन देणं गरजेचं आहे.”

निकी मिनाज बोल्ड आणि वादग्रस्त व्हिडीओजसाठी प्रसिद्ध आहे. हा फेस्टीवल या कारणामुळेही खास होता की, अनेक दशकांपासून एंटरटेंमेंटवर असणारी बंदी हटवल्यानंतर स्थानिक लोक या फेस्टीवलला घेऊन खूप उत्सुक होते.


चाहत्यांनी दिल्या आत्महत्येच्या धमक्या
निकी मिनाज आपल्या निर्णयानंतर खूपच द्विधा मनस्थितीत आहे. तिने ट्विट करत म्हटले आहे की, “माझे अनेक चाहते मला इनबॉक्स करत लिहित आहेत की, जर जेद्दा फेस्टीवलला आली नाहीस तर आत्महत्या करू. परंतु तुम्हाला हे समजायला हवं की, जर कोणताही चाहता अरेस्ट झाला किंवा त्याला आपल्या आयडेंटीटीमुळे मारला गेला तर मला खूप वाईट वाटेल. मी सौदी अरबच्या सरकारचा अनादर करत नाहीये.”

सौदी अरबमध्ये समलिंगी लोकांना अनेक प्रकारच्या छळाचा सामना करावा लागतो. या देशात महिलांनावरही अनेक दशकांपासून कठोर निर्बंध आहेत. निकने असेही म्हटले आहे की, ती सौदी अरब सरकारसोबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. या फेस्टीवलमध्ये दारू नेण्यास मनाई आहे आणि स्ट्रिक्ट सोशल कोड आहे.

सौदी अरबचा प्रिंस मोहम्मद बिन सलमान, उदारवादाच्या लाटेवर स्वार आहे. सिनेमा, काँसर्ट आणि स्पोर्ट्सशी संबंधित इंफ्रास्ट्रक्चरवर लक्ष दिले जात आहे. हा देश सध्या देश एंटरटेंमेंट आणि पर्यटनावर फोकस करताना दिसत आहे. सौदी अरबने अद्याप टुरिस्ट व्हिजा उपलब्ध केलेला नाही. परंतु आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी फास्ट ट्रॅक इलेक्ट्रॉनिक परमिटची सोय करण्यात आली आहे. जेणेकरून पर्यटक या फेस्टीवलचा आनंद घेऊ शकतात. याचा देशाच्या इकॉनॉमीलाही फायदा मिळेल. अनेक लोक या बदलांना बेरोजगारी आणि कोसळणाऱ्या इकॉनॉमीचं लक्ष हटवण्याचं साधन मानत आहेत.

 

आरोग्यविषयक वृत्त

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सावधान ! तांब्याच्या भांड्यात ठेवलेले ‘हे’ पदार्थ बनतात विषारी

माश्या, चिलटांना घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘ही’ फळे दुधासोबत खाणे आरोग्याला नुकसानकारक

चुकीच्या वेळी ‘नारळ पाणी’ पिणे आरोग्यास ‘घातक’ ; जाणून घ्या

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका