निधी अग्रवालनं शेअर केला ‘बाथरूम सेल्फी’ ! काही तासातच मिळाले 6 लाख Likes

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री निधी अग्रवाल (Nidhhi Agerwal) सोशल मीडियावर सुपरअ‍ॅक्टीव्ह असते. आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळं ती कायमच चाहत्यांचं लक्ष वेधत असते. जर तिनं मोठे सिनेमे केले नसले तरीही तिची फॅन फॉलोविंग मोठी आहे. आता पुन्हा एकदा फोटोमुळं तिनं लक्ष वेधलं आहे. निधीनं चक्क तिचा बाथरूम सेल्फी शेअर केला आहे. निधीचा हा सेल्फी सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

निधीनं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. हा तिचा एक बाथरूम सेल्फी आहे. यात निधी खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. निधीचा हा फोटो एवढा व्हायरल झाला आहे की, काही तासातच या फोटोल जवळपास 6 लाख लाईक्स मिळाले आहेत.

निधीचा हा बोल्ड अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे अनेकांनी कमेंट करत तिच्या ब्युटी आणि हॉटेनसचं कौतुक केलं आहे. अजूनही हा फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

निधी तेलगू इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. ती एका नव्या प्रोजेक्टसाठी आता तमिळ शिकत असल्यांच तिनं सांगितलं आहे. गेल्या 6 महिन्यांपासून यासाठी ती ऑनलाईन क्लासेस घेत आहेत. तमिळ भाषेवर कमांड यावी म्हणून ती खूप प्रयत्न करत आहे.

निधीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर टायगर श्रॉफच्या मुन्ना मायकल सिनेमात ती दिसली होती. या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. 2017 साली रिलीज झालेल्या या सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. निधी सव्यासाची, मिस्टर मजनूं, आणि आयस्मार्ट शंकर अशा अनेक गाजलेल्या सिनेमात काम केलं आहे.