Coronavirus : निफाड तालुक्यात 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

लासलगाव : नाशिकनंतर जिल्ह्यातील निफाड तालुक्याचा कोरोना ग्रस्तांचा आलेख वाढता असल्याने कोरोना बधितांचा निफाड तालुक्यात वाढ होताना दिसत आहे आज नव्याने आलेल्या कोरोना अहवालात तालुक्यातील 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे

निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे सर्वाधिक 9 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे तर नांदूर खुर्द 06, निफाड 02, ओझर 02, सायखेडा 01, कसबे सुकेणे 01 ,पिंपळगाव निपाणी 01,विंचूर येथे 01 असे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आज दिवसभरात 23 जणांना कोरोनाची बाधा झाल्याने तालुक्याचा एकूण कोरोना बधितांचा आकडा 369 वर पोहचला आहे आतापर्यंत 200 जणांनी कोरोनावर मात करत घरवापसी केली तर 20 कोरोना बधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे उर्वरित 149 कोरोना बधितांवर लासलगाव कोविड सेंटर , पिंपळगाव क्वारंटाईन सेंटर ,नाशिक येथील शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती निफाड तालुका वैद्यकीय अधिकारी चेतन काळे यांनी दिली