निफाड तालुक्यातील वाकद येथील कालिका माता मंदिरात घरफोडी

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – निफाड तालुक्यातील वाकद शिवार येथील कालिका माता मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून ५४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक 23 फेब्रुवारी सायंकाळी सात वाजेपासून ते 24 फेब्रुवारी पहाटे साडेपाच च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी वाकद येथील कालिका माता मंदिराचे मुख्य दरवाजा व मूर्तीजवळ लहान दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत १५ हजार रुपये किमतीची लाईटींग साठी असलेली बॅटरी, इन्व्हर्टर, मंदिराच्या आवारामध्ये लावलेले १० हजार रुपये किंमतीचे सीसीटीव्ही कॅमेरे, १५ हजार रुपये किमतीचे मशीन, दहा हजार रुपयांचे साऊंड सिस्टिम, अहुजा कंपनीचे एम्पलीयर, दानपेटीतील अंदाजे एक हजार रुपयांचे दान, ३५०० रुपये किमतीची देवीची सोन्याची नथ असा एकून ५४ हजार ५०० रुपये चा ऐवज चोरून नेला.

याप्रकरणी अरुण यादव बडवर यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये घरफोडीचा कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लासलगाव पोलिस करत आहे.