शेअर बाजारात 10 वर्षातील सर्वात मोठी ‘तेजी’ ! सेंसेक्स 2476 अंक उच्चांकीवर जावून बंद, 8 लाख कोटी रूपयांचा फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेनंतर आशियाई बाजारपेठेत जोरदार तेजीमुळे दशांतर्गत बाजारपेठे दिवसेंदिवस नवीन स्तरावर वधारत आहे. BSE चा ३० शेअर असलेला इंडेक्स सेन्सेक्स २४७६ अंकांनी वाढून ३०,०६७ वर बंद झाला. तर NSE चा ५० शेअर असलेला प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स ७०२ अंकांनी जोरदार तेजीसह ८,७८५ च्या स्तरावर बंद झाला आहे. ही १० वर्षातील एका दिवसातील सर्वात उच्च तेजी आहे.

एसकोर्ट सिक्युरिटीजचे रिसर्च हेड आसिफ इकबाल यांनी सांगितले कि जगभरातील बाजारपेठेत तेजी परत आली आहे. याचा फायदा भारतीय बाजारपेठेला मिळणार आहे. या तेजीमध्ये गुंतवणूकदारांना ८ लाख कोटी रुपयांचा फायदा झाला. टक्केवारीनुसार ही १० वर्षातील सर्वात मोठी तेजी आहे.

का आली शेअर बाजारात तेजी ?

१) अमेरिकेच्या शेअर बाजारातही तेजी :- कोरोनाची नवीन प्रकरणे वेगाने कमी झाल्याने अमेरिकेच्या बाजारपेठेत ७ टक्के वाढ पाहायला मिळाली. काल Dow 1600 अंकांनी जास्त वर होता. कालच्या कारभारात S&P 500, Nasdaq देखील जास्त वाढला. आशियाई बाजारपेठेत देखील मजबुती पाहायला मिळत आहे.

२) कच्च्या तेलाच्या किंमती :- क्रूड उत्पादन कपातीवर एकमत होण्याचे संकेत मिळत असून यावर रशिया आणि सौदी अरेबियामध्ये कराराची शक्यता आहे. आसिफ इकबाल यांचे म्हणणे आहे की, कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजीमुळे अनके देशांच्या अर्थव्यवस्थेला मदत मिळेल. तर किंमतीत मोठी घट झाल्याने फायदा नाही तर नुकसान जास्त आहे. कारण भारतात रिफायनिंग कंपन्यांसह कच्च्या तेलाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्याही आहेत.

३) जपानमध्ये मदत पॅकेजची घोषणा :- कोरोनाशी सामना करण्यासाठी जपानमध्ये एक मोठ्या मदत पॅकेजची घोषणा केली गेली. जपानने ७५ लाख कोटी रुपयांचे (१ लाख कोटी डॉलर्स) मदत पॅकेज जाहीर केले असून सध्या कोरोनावर उपचार शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका संशोधनातून असे दिसून आले आहे की, कोरोना उपचारात अँटी पॅरासिटिक औषधांचा वापर शक्य आहे. प्रयोगशाळेच्या चाचण्यांमध्ये अँटी पॅरासिटिक औषध कोरोनाच्या उपचारात यशस्वी आढळले आहे. ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ असा दावा करतात कि अँटी पॅरासिटिक औषध ४८ तासांत विषाणूचा नाश करू शकते.