…म्हणून ‘त्याने’ चावा घेऊन तोडला कानाचा ‘तुकडा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चारचाकी गाडी लावायला अडथळा होतो, म्हणून झालेल्या वादावादीत तरुणाने पतीपत्नीला मारहाण करुन पतीच्या कानाचा चावा इतका करकचून घेतला की त्याच्या कानाचा तुकडाच पडला.

निगडीतील यमुनानगर येथील येथील सेक्टर २१ मध्ये ही घटना ८ जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली आहे. निगडी पोलिसांनी अभिजित गुंजाळ (रा. बिल्डिंग नं.१३, स्किम नं.६, सेक्टर २१, यमुनानगर, निगडी) याच्यावर गुन्हा दखल केला आहे.

पार्किंगचा कोणताही विचार न करता वेगाने उंचच उंच इमारती उभ्या करायच्या. त्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना खुष करुन परवानग्या मिळवायच्या या प्रकाराने पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये बहुतांश सोसायट्यांमध्ये पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनू लागला आहे. एकाने केलेल्या पार्किंगमुळे दुसऱ्याला त्याची गाडी काढता न येणे, आणखी एखाद्याला पार्किंगसाठी जागाच न मिळणे अशा कारणावरुन रात्री व सकाळी सकाळी सोसायट्यांमध्ये वाद झडू लागले आहेत.

निगडीतील ही घटना हा त्याचाच एक प्रकार आहे. याप्रकरणी कौतुभ महेंद्र गोळे (वय २६, रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ८ जुलैला रात्री साडेअकरा वाजता गोळे यांची पत्नी सुषमा यांनी कौतुभ यांना तुमच्या मोटारसायकलवर बसून अभिजित काही तरी खोडसाळपणा करीत असल्याचे सांगितले. तेव्हा ते दोघेही खाली आले. त्यांना पाहून अभिजित चाचपला व त्याने कौतुभ याच्या मोटारसायकलला लाथ मारुन ती पाडली.

याचा जाब कौतुभने विचारला असता त्याने माझ्या फोर व्हिलरला पार्किंग करताना अडथळा होतो, असे सांगून लोखंडी टॉमीने कौतुभ व त्याची पत्नी सुषमा यांना डोक्यावर मारुन जखमी केले. त्याने कौतुभ यांच्या उजव्या कानाचा चावा इतका जोरात घेतला की त्यामुळे कानाचा तुकडाच पडला. कौतुभ यांनी त्यावर उपचार केल्यानंतर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय