नायजेरियनला ३ लाखाच्या ‘MD’ पावडरसह अटक

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंब्र्यात एम डी पावरडरच्या विक्रीसाठी आलेल्या एका नायजेरियनला पोलिसांनी अटक केली आहे.

अँनी चिमेझी बेन्जामिन (वय ३१, रा. नवी मुंबई) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून तीन लाख रुपयांची एम डी पावडर हे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

मुंब्रा बायपास रोड येथे एक नायजेरियन व्यक्ती एमडी पावडर या अंमली पदाथार्ची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरिक्षक संजय गळवे यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचुन त्याला ताब्यात घेत अंग झडतीत त्याच्याकडून १३२ ग्रॅम वजनाची एमडी पावडर जप्त केली, त्याची किंमत २ लाख ९० हजार इतकी असून त्याच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम ८ (क) २२ (ब),२९ अन्वेय गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे 

चमकणाऱ्या ‘विजांपासून’ असा करा स्वतःचा बचाव 

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय 

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक