३ लाखांच्या कोकेनसह नायजेरियन मोठ्या मॉलमधून अटकेत

कस्टम विभागाच्या नार्कोटिक्स सेलची कामगिरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) अधिकाऱ्यांनी औंध परिसरातील एका मोठ्या म़ॉलमध्ये सापळा रचून नायजेरियन तरुणाला पकडले. त्याच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारात ३ लाख रुपये किंमत असलेले ३८ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले.

अलेक्स थोम्बा असे त्याचे नाव आहे. त्याला पुण्याच्या एनडीपीएस कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा शुल्क विभागाच्या नार्कोटिक्स सेलच्या अधिकाऱ्यांना औंध येथील एका मॉलमध्ये नायजेरियन व्यक्ती कोकेन घेऊन आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी तेथे जाऊन त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे ३८ ग्रॅम कोकेन मिळून आली. त्याच्याकडून कोकेन जप्त करत अटक करण्यात आली. त्याला एनडीपीएस कोर्टात हजर करण्यात आले तेव्हा कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पुण्यात त्याचे ग्राहक कोण आहेत. तसेच त्याने कोणाकडून कोकेन विकत घेतले याचा तपास सुरु आहे. त्याच्याकडून जप्त केलेल्या कोकेनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ३ लाख रुपये आहे.