home page top 1

पुण्यात 10 लाखांचे कोकेन बाळगणारा ‘नायजेरियन’ अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोंढवा भागात कोकेन विक्रीसाठी आलेल्या नायजेरियन तरुणाला पकडून त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल १० लाख रुपयांचे २०० ग्रॅम कोकेन जप्त केले आहे.
उबा सव्हियर गोडविन (वय ३१, रा. पिसोळी) असे या नायजेरियन तरुणाचे नाव आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक महाडिक, व त्यांचे पथक गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की, कोंढवा येथील ब्रम्हा अवेन्यू सोसायटीसमोर एक नायजेरियन कोकेन विक्रीसाठी येणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन महाडिक व त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथे सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार एक नायजेरियन तरुण आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतल्यावर त्याच्याकडे २०० ग्रॅम कोकेन, १ लाख ८४ हजार १९० रुपये रोख रक्कम, मोबाईल, मोटारसायकल असा एकूण १२ लाख १५ हजार ४९्र रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महाडिक, कर्मचारी प्रसाद मोकाशी, रमेश गरुड, महेश कदम, पांडुरंग वांजळे, उदय काळभोर, अमोल पिलाणे, प्रवीण पडवळ, संदीप साबळे, सचिन कोकरे यांनी केली आहे.

Visit – policenama.com 

Loading...
You might also like