स्वप्नात ‘या’ 11 गोष्टी दिसणे मानले जाते अपशकुन, मिळतात ‘हे’ संकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   झोपेत स्वप्न पहाणे सामान्य बाब आहे. स्वप्न खुप काही सांगतात आणि तुम्ही त्याद्वारे तुमच्या आगामी काळाबद्दल अंदाज लावू शकता. काही स्वप्न चांगली तर काही वाईट असतात. स्वप्नात काय पहाणे अपशकुन मानले जाते, ते जाणून घेवूयात…

स्वप्नात मांजर दिसणे –

स्वप्नात मांजर दिसणे अपशकुन मानला जातो. हे दुर्दैव्य येण्याचे संकेत असू शकतात. एखाद्याकडून फसवणूक होऊ शकते असाही हा संकेत आहे.

साप दिसणे –

एका खड्ड्यात अनेक साप दिसणे एक भितीदायक स्वप्न असते. तुमच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक जीवनात एखादी समस्या येण्याचा हा संकेत असू शकतो.

दुर्दैव्य दिसणे –

जर स्वप्नात हे दिसत असेल की नशिब आपल्याला साथ देत नाही तर या गोष्टीचा हा संकेत असू शकतो की, तुम्ही तुमच्या क्षमतांना कमी समजत आहात. हे स्वप्न सांगते स्वत:वर विश्वास ठेवा.

किडे दिसणे –

ज्योतिषशास्त्रात स्वप्नात किडे दिसणे, हे जीवनात येणारे चढ-उतार दर्शवतात.

भुरकट किंवा धुके दिसणे –

स्वप्नात भुरकट किंवा धुके दिसण्याचा अर्थ आहे, जीवनात काही गोष्टी आणि लोकांना स्पष्टपणे पाहू शकत नाही. मानातील एखाद्या वस्तूबाबत संशय सुद्धा यातून दिसतो.

स्वप्नात रडणे –

अशा स्वप्नाचा संकेत आहे की, तुमच्या जीवनात एखादा कठिण काळ येणार आहे.

स्वत: पडताना किंवा दुखापत होताना पहाणे –

जर स्वप्नात तुम्ही स्वत:ला वरून खाली पडताना किंवा दुखापत होताना पहात असाल तर हा सुद्धा येणार्‍या अडचणींचा संकेत आहे.

कुत्र्याचे भुंकणे –

जर स्वप्नात कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकला तर हा गोष्टीचा संकेत आहेत की, तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या समस्यांचा परिणाम तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रावर पडू शकतो.

उंदरांचे उडी मारणे –

स्वप्नात उंदीर तुमच्यावर अंगावर उडी मारताना दिसणे किंवा कपड्यांमध्ये उंदीर दिसले तर सतर्क व्हा. याचा अर्थ आहे आपल्या मित्रासह एखाद्या घोटाळ्यात फसू शकता. यामुळे तुम्हाला दुर्दैव्याचा सामना करावा लागू शकतो.

स्वप्नात मृत व्यक्ती दिसणे –

स्वप्नात मेलेली व्यक्ती दिसणे सुद्धा अशुभ संकेत मानला जातो.

एखादी आजारी व्यक्ती दिसणे –

स्वप्नात एखादी आजारी व्यक्ती दिसणे अपशकुन मानला जातो.