व्हॅकेशन फोटो शेअर करणाऱ्या बॉलिवूड सेलेब्सवर संतापला निखिल द्विवेदी ! म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाइन – मनोरंजन क्षेत्रातील अनेक स्टार्स सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत. आजकाल एवढे सेलिब्रिटी सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी मालदीवला गेले आहेत ते आता दुसरं मुंबई बनताना दिसत आहे. सेलिब्रिटींनी अशा प्रकारे व्हॅकेसन एन्जॉय करणं आणि त्याचे फोटो सोशलवर शेअर करणं, यावरून आता बॉलिवूड स्टार आणि प्रोड्युसर निखिल द्विवेदी (Nikhil Dwivedi) यानं संताप व्यक्त केला आहे.

जर्नलिस्ट बरखा दत्त (Barkha Dutt) च्या एका ट्विटला उत्तर देताना निखिलनं लिहिलं की, सर्वांना असं वाटत आहे की, सेलिब्रिटीज हार्टलेस आहेत, परंतु असं नाहीये ते फक्त मुर्ख आहेत. आपण स्वत:मध्येच एवढं हरवून गेलो आहोत की, आसपासच्या गोष्टींपासून आपण बेसावध आहोत. मी हा विश्वास देतो की, ते हार्टलेसन नाही तर मुर्ख आहेत.

निखिलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर अलीकडेच तो स्कॅम 1992 : द हर्षद मेहता स्टोरी या वेब सीरिजमध्ये दिसला होता. स्कॅम 1992 : द हर्षद मेहता स्टोरी ही वेब सीरिज स्टॉक मार्केटमधील स्कॅमवर आधारित आहे. याला आयएमडीबीवर 9.6 रेटिंग मिळाली आहे. निखिलनं वीरे दी वेडिंग आणि दबंग 3 असे सिनेमे प्रोड्युस केले आहेत. विशाल फुरिया डायरेक्टेड आणि निखिल द्विवेदीद्वारा प्राेड्युस केलेल्या एका 3 सिनेमांच्या शृंखलेत अभिनेत्री श्रद्धा कपूर नागिनच्या लुकमध्ये दिसणार आहे.

You might also like