लातुरच्या पोलीस अधीक्षकपदी पुणे जिल्हातील पाबळ गावाचे सुपुञ निखिल पिंगळे यांची नियुक्ती

शिक्रापूर : पुणे जिल्हातील शिरुर तालुक्याचे सुपुञ वर्धा ग्रामीण पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची लातुर जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली.

राज्यातील ३३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारच्या गृह विभागाने काढले आहेत लातुर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून निखिल पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रथम गडचिरोली, चंद्रपूर, पंढरपूर, वर्धा याठिकाणी निखिल पिंगळे यांनी त्यांच्या कारकिर्दीत जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांच्या तपासावर लक्ष केंद्रित केले होते.

खून, दरोडे, दरोड्याच्या तयारीत असलेले टोळी वाळु तस्करी अशा गंभीर गुन्ह्यांच्या तपासात त्यांचे स्थानिक पोलिसांना नेहमी मार्गदर्शन असायचे.पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पाबळ गावातील एका छोट्या कुटुंबातील असेलेले “निखिल पिंगळे” आज पोलीस अधीक्षक पदी लातुर येथे नियुक्ती होत आहेत गडचिरोली, पंढरपूर, वर्धा याठिकाणी कार्यरत असताना गुन्हागारांचा कर्दनकाळ होऊन बेमोड करण्याचा आणि पोलीस प्रशासनाची गुन्हेगारांच्या प्रती जरब कायम ठेवण्यासाठी निखिल पिंगळे यांनी खास मोहीम यशस्वी राबविली होती त्याच्या कामाप्रती निष्ठा आणि त्याच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना लातुर येथे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे लवकरच ते लातुर येथील नवीन पुलिस अधिक्षक म्हणून रुजू होतील त्याच्या पुढील कार्यास वाटचालीसाठी हर्दिक शुभेच्छा