Nikita Takle-Khadsare | लोणावळाच्या ऑटो क्रॉस मध्ये फास्टर ड्रायव्हरसह 9 ट्रॉफी पटकविल्या; निकिता टकले खडसरेचे यश

Nikita Takle-Khadsare | Won 9 trophies including Fastest Driver in Lonavla Auto Cross; Success of Nikita Takale Khadsare
File Photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Nikita Takle-Khadsare | मुंबई एक्सप्रेस लोणावळा जवळील नानोली मध्ये इंडियन नॅशनल ऑटो क्रॉस आयोजित करण्यात आली होती, अतिशय चूरशीच्या या ऑटो क्रॉस मध्ये पुण्याच्या निकिता टकले खडसरेने (Nikita Takle-Khadsare) फास्टर ड्रायव्हर व विविध गटात नऊ ट्रॉफी पटकविल्या. ट्रॅकवर माती, दगड असताना कमी वेळ नोंदविताना गाडीवरील नियंत्रण ठेवण्याचा निकिताचा प्रयत्न यशस्वी ठरला.

 

हंगामातील पहिल्या इंडियन नॅशनल ऑटो क्रॉस 2023 मध्ये मुंबई, पुणे, गोवा, बेंगलोर, चिकमंगलूर, हैद्राबाद अशा अनेक भागातून 40 च्या आसपास कार ऑटो क्रॉस स्पर्धक सहभागी झाले होते, या दोन दिवसीय ऑटो क्रॉस मध्ये मिळून 14 हून अधिक गटाच्या स्पर्धा होत्या, दिग्गज रायडर या ऑटो क्रॉस मध्ये सहभागी झालेले असताना नवख्या निकिताने तब्बल नऊ ट्रॉफी पटकविल्या. (Nikita Takle-Khadsare)

 

यामध्ये 1मिनिट 13 सेकंद सर्वात कमी वेळ घेऊन फास्टर ड्रायव्हरची ट्रॉफीही मिळविली.

 

देशातील व परदेशातील अनेक रॅलीत सहभागी होत असताना पुण्यात ऑटो क्रॉस होत असल्याने दडपण होते मात्र गुरु चेतन शिवराम निकिताचे वडिल उद्योजक नितीन टकले, व आईने मार्गदर्शन केल्याने या रॅलीत चांगला परफॉर्मन्स दाखविल्याचे निकिता टकले खडसरेने आवर्जून सांगितले.

आजवर भारतात अनेक कार रॅली मध्ये सहभाग नोंदविताना निकिताने अनेक पारितोषिके मिळविली आहेत,
आगामी हैद्राबाद ऑटो क्रॉस, अरुणाचल रॅली में मध्ये होणार आहे या रॅलीत निकिता पुणे महाराष्ट्रातून सहभाग होणार आहे. यामध्ये महाराष्ट्राचे नाव उज्वल करणार असल्याचे निकिताने सांगितले. तसेच इंडोनेशिया मध्ये होणाऱ्या एशिया पॅसिफिक रॅली चॅम्पियनशिप मध्ये भारतातून एकमेव महिला म्हणून निकिता प्रतिनिधित्व करणार आहे.

 

Web Title :- Nikita Takle-Khadsare | Won 9 trophies including Fastest Driver in Lonavla Auto Cross; Success of Nikita Takale Khadsare


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update


हे देखील वाचा

 

Pune Chandani Chowk | चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाला गती, 90 टक्के काम पूर्ण; उद्घाटनाची तारीख ठरली

S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा ! एमईएस क्रिकेट क्लब संघ बाद फेरीत

Maharashtra Politics News | आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत शिंदे गटाच्या महिला नेत्याचा खळबळजनक दावा, म्हणाल्या- ‘उद्धव ठाकरे भेटून गेले अन्…’

S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा ! एमईएस क्रिकेट क्लब संघ बाद फेरीत

Maharashtra Politics News | आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत शिंदे गटाच्या महिला नेत्याचा खळबळजनक दावा, म्हणाल्या- ‘उद्धव ठाकरे भेटून गेले अन्…’

Total
0
Shares
Related Posts