कोण आहेत भारतीय वंशाच्या निकी हेली, ज्या अमेरिकेत कमला हॅरिस यांना ‘टक्कर’ देवू शकतात ?

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकी मुळे भारतीय वंशाचे अमेरिकन सुद्धा महत्वाच्या भूमिकेत असतील. ट्रम्प यांच्याविरूद्ध राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बिडन या गोष्टीवर जास्त लक्ष देत आहेत आणि सातत्याने भारताच्या हिताबाबत बोलत आहेत. एवढेच नव्हे, तर उप राष्ट्राध्यक्ष पदासाठी त्यांनी मुळ भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना उमेदवार केले आहे.

ट्रम्प यांनी अशाप्रकारची कोणतीही घोषणा केली नसली तरी, ट्रम्प समर्थक अंदाज वर्तवत आहेत की, ते कमला हॅरिस यांच्या विरोधात निकी हेली यांचे नाव समोर आणू शकतात. निकी सुद्धा मुळ भारतीय वंशाच्या आहेत. जाणून घेवूयात, दोघी आमने-सामने असतील तर भारतीय कोणाला चांगले मानू शकतात.

का वर्तवला जातोय अंदाज
कमला हॅरिस आणि निकी हेली दोघी भारतीय वंशाच्या पहिल्या पिढीच्या अमेरिकन आहेत आणि त्या महिलांपैकी आहेत, ज्या वर्णभेद आणि छुपा भेदभाव असूनही आपआपल्या पक्षात टॉपवर पोहचल्या आहेत. आता डेमोक्रेट्सकडून कमला यांची मजबूत दावेदारी पाहता अमेरिकन राजकीय विश्लेषक अंदाज वर्तवत आहेत की, कदाचित ट्रम्प उप राष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांच्याऐवजी निकी हेली यांना उमेदवार म्हणून समोर आणू शकतात. जेणेकरून जास्तीत जास्त भारतीय अमेरिकनांना आकर्षित करता येईल.

निकी हेली
संयुक्त राष्ट्रामधील (यूएन) राजदूत आणि साऊथ कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर निकी हेली यांचा जन्म अमेरिकेच्या एका अप्रवासी पंजाबी कुटुंबात झाला. हेली यांचे वडील सरदार अजीत सिंह रंधवा आणि आई राज कौर रंधवा पंजाबच्या अमृतसरमधून अमेरिकेत येऊ स्थायिक झाले होते. निकी यांचे संपूर्ण नाव निमराता निकी रंधवा होते. नंतर त्यांनी ईसाइ धर्म स्वीकारला आणि मायकल हेली नावाच्या अमेरिकन व्यक्तीशी विवाह केला, जे आर्मी नॅशनल गार्डमध्ये कॅप्टन आहेत.

अनेक विक्रम केले
निकी कमी वयातच आपल्या कुटुंबाच्या आर्थिक प्रकरणात आणि बजेटमध्ये खूप लक्ष देत असत. 2010 मध्ये त्या अल्पसंख्यांक समाजातून प्रथम गव्हर्नर बनल्या. अमेरिकेतील सर्वात तरूण गव्हर्नर हा विक्रम सुद्धा त्यांनी केला. त्या तेव्हा केवळ 37 वर्षांच्या होत्या. नंतर 2018 मध्ये ट्रम्प यांच्याशी काही मदभेद झाल्याने त्यांनी यूएन राजदूत म्हणून राजीनामा दिला. मात्र, तेव्हा सुद्धा स्पष्ट केले होते की, त्या ट्रम्प यांच्यासाठी प्रचार करतील. म्हणजे आता जर ट्रम्पा व्हाईस प्रेसीडेन्टसाठी निकी यांच्याशी चर्चा केली तर आश्चर्य वाटायला नको.

कोण आहेत कमला हॅरिस
डेमोक्रॅट्स पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस मुळ भारतीय वंशाच्या आहेत. त्यांची आई चेन्नईच्या ब्राह्मण कुटुंबातील होती. तर आजोबांचे नाव पी. व्ही. गोपालन होते. ते भारतीय लोक सेवेत अधिकारी होते. त्यांनी जाम्बियामध्ये सुद्धा सरकारसाठी सेवा दिली. गोपालन यांची मोठी मुलगी श्यामला अमेरिकेत शिकत होती. श्यामला यांची मुलगी कमला हॅरिय आहेत. कमला यांच्या वडीलांचे नाव डोनाल्ड हॅरिस जमॅकन होते.

कमला यांचा जन्म अमेरिकेत झाला. नंतर आई – वडील विभक्त झाले. यानंतर कमला भारतीय संस्कृतीबाबत बोलत असत पण सामान्यपणे त्या आपण जमैकन वंशाच्या असल्याचे बोलत असत. यावरून भारतीय अमेरिकन मतदारांची त्यांच्यावर नाराजी आहे, असे त्यांचे विरोधक म्हणतात.

कमला हॅरिस अमेरिकेच्या उप राष्ट्राध्यक्ष झाल्या तर भारत-अमेरिकेचे संबंध मजबूत होतील. मात्र, काश्मीर आणि नागरिकत्व कायद्यावर त्यांची कोणती भूमिका असणार, हे पाहणे मोदी सरकारसाठी महत्वाचे ठरणार आहे. कमला हॅरिस कायदा सुव्यवस्था आणि मानवाधिकारांबाबत अतिशय रोखठोक भूमिका घेणार्‍या म्हणून ओळखल्या जातात. काश्मीरमधील कलम -370 च्या मुद्द्यावर आणि मानवाधिकारबाबत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

इंडिया टुडेशी बोलताना कमला हॅरिस यांचे मामा डॉ. गोपालन बालचंद्रन यांनी म्हटले, तिच्यामध्ये जनसेवा आणि मानवाधिकारांबाबत प्रचंड संवेदनशीलता आहे. ती भले भारतीय वंशाची असली तरी, उप राष्ट्राध्यक्ष किंवा एक खासदार म्हणून तिला वाटते की, भारतात काही असे घडत आहे ज्यामुळे मानवाधिकाराचे उल्लंघन होत आहे तर ती स्पष्टपणे आपले मत मांडण्यास मागेपुढे पाहणार नाही. कलम 370 वर विचारल्यावर बालचंद्रन यांनी म्हटले, कमला कलम 370 वर जो स्टँड घेईल, तो काश्मीरमध्ये नागरिकांचे स्वातंत्र्य बाधित होणे किंवा नेटवर्क कनेक्टिव्हिटी नष्ट करण्याशी संबंधीत जोडलेला असेल.

मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कमला हॅरिस यांनी भारतीय अमेरिकन खासदार आणि आपल्या सहकारी प्रमिला जयपाल यांची भेट न करण्यावरून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यावर कठोर टीका केली होती. कमला हॅरिस यांनी ट्विट केले होते की, कोणत्याही परराराष्ट्राच्या सरकारला हे सांगणे अजिबात अयोग्य आहे की, काँग्रेसच्या बैठकीत कोणत्या सदस्यांना बोलावण्याची परवानगी दिली जावी आणि कुणाला नाही. उघड आहे की, जर कमला हॅरिस उप-राष्ट्राध्यक्ष बनल्या तर मोदी सरकारची नजर या गोष्टींकडे राहील.

डेमोक्रेटिक पार्टीचे विरोधक असलेले भारतीय-अमेरिकन हे जो बायडन आणि कमला हॅरिस यांच्या डेमोक्रेटिक पार्टीला भारतविरोधी असल्याचे मानतात. टिकाकारांचे म्हणणे आहे की, डेमोक्रेटिक पार्टी, डावे आणि पुरोगामींचा गड आहे जे काही मुस्लिम गटांच्या इशार्‍यावर मोदी सरकारवर टीका करतात. डेमोक्रेटिक पार्टीकडून राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बायडन यांनी निवडणुकीच्या अगोदर मुस्लिम अमेरिकन समुदायासाठी एक अजेंडा प्रकाशित केला आहे, ज्यामध्ये त्यांनी काश्मीरमध्ये उचलण्यात आलेल्या पावलांवर आणि सीएएच्या मुद्यावर मोदी सरकारवर टीका केली आहे.

याउलट, रिपब्लिकन पार्टीचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरच्या घटनाक्रमावर हळू आवाजात प्रश्न उपस्थित करण्याशिवाय भारताचे अंतर्गत प्रकरण असल्याचे म्हणत टिप्पणी करण्याचे टाळले. मागील प्रशासनाने मोदी सरकारला शस्त्रात्र पुरवठा केला होता आणि चनीसोबतच्या सध्याच्या सीमा वादात मोदी सरकारला खुले समर्थन दिले. पीएम मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प एकमेकांसोबत रॅलित सुद्धा दिसले आहेत. ह्यूस्टनमध्ये हाउडी मोदी कार्यक्रमात पीएम मोदी यांनी भारतीय-अमेरिकन समाजाला ट्रम्प यांना मत देण्याचे आवाहन केले होते.

ऑब्जर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये संशोधक आणि सेवानिवृत्त मुत्सद्दी नवदीप सूरी यांचे म्हणणे आहे की, भारतीयांनी कमला हॅरिस यांच्या नामांकनामुळे जास्त आनंदी होऊ नये. अमेरिकेसोबत जवळच्या नात्याची शक्यता पाहता खुश होत असाल, तर आपल्याला हे सुद्धा पाहिले पाहिजे की, कमला हॅरिस मानवाधिकाराच्या मुद्द्यावर अतिशय रोखठोक आहेत किंवा एखाद्या अन्य मुद्द्यावर त्यांचे मत भारतातील मोदी सरकारला त्रासदायक ठरू शकते.

वॉशिंग्टनच्या वरिष्ठ पत्रकाराने म्हटले, अमेरिकेतील सध्याचे रिपब्लिकन पार्टीचे सरकार तुलनेत डेमोक्रेटिक पार्टीचे सरकार एखादवेळी भारताच्या बाजून नसू शकते. मात्र, इमिग्रेशन आणि विजा नियमांबाबत कमला हॅरिस सध्याच्या ट्रम्प सरकारच्या तुलनेत जास्त अनुकूल असू शकतात, ज्याचा फायदा भारतीयांना होईल. मागच्या वर्षी, कमला हॅरिस यांनी ग्रीन कार्डची संख्या वाढवण्याचे विधेयक पास करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु, हे विधेयक पास होऊ शकले नाही.