Nikki Tamboli Bold Look | निक्की तांबोळीनं केलं बोल्ड फोटोशूट, ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटोनं चाहत्यांना लावलं वेड !

पोलीसनामा ऑनलाईन टीम –   ‘बिग बॉस 14 (Bigg Boss 14)’ मध्ये निक्की तांबोळी (Nikki Tamboli) स्पर्धक म्हणून होती. ‘बिग बॉस’ मधून बाहेर आल्यानंतर तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. ती सतत सोशल मीडियावर आपले हॉट आणि बोल्ड फोटो (Nikki Tamboli Bold Look) शेअर करत असते. तसेच फॅशनच्या बाबतीत इतर अनेक कलाकारांपेक्षा ती एक पाऊल पुढेच आहे. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होताना दिसतात. तिनं नुकतंच सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर ( Nikki Tamboli Instagram Photo ) एक फोटो शेअर केलाय. त्या फोटोनं (Nikki Tamboli Bold Look) तिच्या चाहत्यांना चांगलंच आकर्षित केलं आहे.

निक्कीनं शेअर केलेल्या फोटो ती अगदी स्टाईलिश दिसत आहे. तिच्या या फोटोनं प्रेक्षकांचं चांगलंच ध्यान ओढवून घेतलं आहे. फोटोमध्ये निक्कीने पांढऱ्या रंगांचा ऑफ शोल्डर वन पिस घातला आहे. तर आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिने न्यूड मेकअप केलाय. केसांना थोड कर्ल केलंय. या फोटोमध्ये निक्कीचा अंदाज एकदमच बोल्ड आहे. त्यामुळे चाहत्यांना तिच्या या फोटोंनी  चांगलंच वेड लावलं आहे.

https://www.instagram.com/p/CZdgigLpQcW/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, निक्कीच्या या फोटोला जवळपास 5 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. फोटोला कमेंट करून अनेक चाहते निक्कीवर प्रेमाचा वर्षाव करत आहे. चाहत्यांसोबतच इतर कलाकारांनी देखील निक्कीच्या (Nikki Tamboli Instagram Photo) या फोटोला कमेंट करून आपलं प्रेम व्यक्त केला आहे.

Web Title :  nikki tamboli shares her bold look in white tube gown

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा