ॲथलेटिक्स कोच निकोलई स्नेसारेव यांचा NIS पटियाला वसतिगृहातील खोलीत मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

वृत्तसंस्था – भारतीय क्रीडा विश्वासाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स येथील वसतिगृहातील खोलीत मध्यम आणि लांब पल्ल्याचे प्रशिक्षक निकोलई स्नेसारेव हे मृतावस्थेत आढळले. भारतीय महासंघाने याबाबत माहिती दिली. बेलारुस येथील ७२ वर्षीय स्नेसारेव यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. दोन वर्षांच्या कालावधीनंतर सप्टेंबरच्या शेवटी ते या पदासाठी भारतामध्ये आले होते.

एएफआयचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला म्हणाले, शुक्रवारी झालेल्या इंडियन ग्रँड पिक्स ३ साठी ते बंगळुरूवरून एनआयएस येथे आले होते. पण जेव्हा ते स्पर्धेसाठी पोहाेचले नाहीत तेव्हा संध्याकाळी प्रशिक्षकांनी त्यांच्याबद्दल चौकशी केली तेव्हा त्यांची खोली आतून बंद असल्याचे आढळले.

मृत्यूचे कारण कळू शकले नाही

सुमारीवाला म्हणाले, ”जेव्हा दरवाजा तुटला तेव्हा ते आपल्या पलंगावर पडले होते. एनआयएस येथील स्पोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आणि साईच्या पथकाने त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. पोस्टमार्टमनंतरही त्यांच्या मृत्यूचे कारण कळले नाही.”

स्नेसारेव ३००० मित्रा स्टीपलचेस ॲथलिट अविनाश साबळे आणि माध्यम व लांब पल्ल्याच्या इतर धावपट्टूंना टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्र होण्यासाठी प्रशिक्षण देत होते. साबळेनी त्यांना सोडल्यानंतर लष्कराचे कोच अमरीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग करण्याचा निर्णय झाल्यानंतर त्यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये भारतीय मध्यम आणि लांब अंतराच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांचा करार ऑलिम्पिक संपेपर्यंत होता, जो करार कोविड – १९ साथीच्या आजारामुळे वर्षभरासाठी पुढे ढकलला गेला.