Nilesh Lanke-Gajanan Marne | नवनिर्वाचित खासदार निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात, पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेत स्वीकारला सत्कार (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Nilesh Lanke-Gajanan Marne | अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे (Ahmednagar Lok Sabha) नवनिर्वाचित खासदार निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेची (Gangster Gajanan Marne) लंके यांनी भेट घेतली. तसेच त्याने केलेला सत्कार देखील स्वीकारला. लंकेंचा सत्काराचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमुळं लंकेंपुढील अडचणी वाढणार असल्याचं बोललं जात आहे. या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.(Nilesh Lanke-Gajanan Marne)

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नवनिर्वाचीत खासदार निलेश लंके यांनी पुण्यातील कुख्यात गुन्हेगार गजा मारणे याची भेट घेतली. त्यानंतर निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कार स्वीकारला. याचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत असून यावरुन आता राजकीय वाद रंगण्याची शक्यता आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेतली होती. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. या भेटीवरुन अजित पवार यांनी पार्थ पवार यांना चांगलेच फटकारले होते, असे अजिबात घडता कामा नये, असेही बजावले होते.

कोण आहे गजा मारणे

गजा उर्फ महाराज उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे याचा जन्म मुळशी तालुक्यातील एका छोट्या गावात झाला.
पुण्यातील कोथरूड परिसरातील शास्त्रीनगर परिसरात राहण्यासाठी आल्यानंतर गजा मारणे गुन्हेगारी क्षेत्राकडे वळला.
पुण्यातील घायवळ गँग आणि मारणे गँग यातील वर्चस्वाचा वाद पुण्यात एकेकाळी प्रचंड गाजला.
त्यानंतर अमोल बधे आणि पप्पू गावडे खून प्रकरणात गजा मारणे याला अटक झाली. तो तीन वर्ष येरवडा कारागृहात होता.
गजा मारणे हा मारणे टोळीचा म्होरक्या असून या टोळीवर 23 होऊन अधिक गुन्हे दाखल आहेत.
तर गजा मारणेवर सहा पेक्षा अधिक खुनाचे गुन्हे दाखल आहेत.
मागील वर्षी पुण्यातील व्यावसायिकाला 20 कोटी रुपयांची खंडणी मागणी केल्याप्रकरणात गजा मारणे याला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी: 12 रुपये पाठवण्यास सांगून ज्येष्ठ नागरिकाला 3 लाखांचा गंडा

Pune Crime News | पुणे: चौकशीसाठी बोलावून महिलेला पोलीस ठाण्यात ‘थर्ड डिग्री’ टॉर्चर, पोलीस उपनिरीक्षक व 5 पोलीस कर्मचाऱ्यांसह 9 जणांवर FIR