Nilesh Lanke | भाजपच्या “या” नेत्याच्या आश्वासनानंतर महामार्गाच्या दुरुस्तीसाठीचे नीलेश लंकेंचे उपोषण मागे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी पारनेर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) उपोषणाला बसले होते. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी गेले चार दिवस आमरण उपोषण केले. हे उपोषण अखेर शुक्रवारी चौथ्या दिवशी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेता अजित पवार यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले.

अजित पवार उपोषणस्थळी आल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांशी रस्त्याच्या कामासंदर्भात चर्चा केली. तसेच पवार यांनी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना फोन करून महामार्गाच्या दुरुस्तीसंदर्भात चर्चा केली. यावेळी नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनीदेखील गडकरींसोबत फोनवर चर्चा केली. गडकरींकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर पवारांच्या उपस्थितीत नीलेश लंके यांनी उपोषण मागे घेतले.

अहमदनगर-पाथर्डी, अहमदनगर ते कोपरगाव आणि अहमदनगर ते करमाळा-टेंभुर्णी या रस्त्यांची दुरुस्ती करावी,
अशी मागणी आमदार नीलेश लंके यांनी केली होती.
यासंबंधी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या उत्तरावर त्यांचे समाधान झाले नाही.
त्यामुळे त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले. जोपर्यंत वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ठोस शब्द देत नाहीत,
तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही, अशी स्पष्ट भूमिका लंके यांनी घेतली होती.
लंके आणि त्यांच्याबरोबर बसलेल्या उपोषणकर्त्यांची शुक्रवारी डॉक्टरांनी तपासणी केली होती.
यावेळी आमदार नीलेश लंकेंचे दोन किलो वजन कमी झाले होते.
लंके यांना पाठिंबा देण्यासाठी नगर तालुक्यातील करंजी, टाकळी ढोकेश्वर, पारनेर चिचोंडी पाटील, आरणगाव
या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून रस्ता रोकोही केला गेला. मात्र, अखेर अजित पवार यांच्या प्रयत्नाने व नितीन गडकरींच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

Web Title :- Nilesh Lanke | mla nilesh lanke hunger strike called off after ncp leader ajit pawar called union minister nitin gadkari

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lonavala Local | कामशेत स्थानकाच्या कामामुळे पुणे लोणावळा मार्गावरील अनेक लोकल रद्द

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध; MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 89 जणांवर कारवाई