Nilesh Rane | ‘4 वेळा मुख्यमंत्री, जवळपास 20 वर्ष केंद्रात मंत्री, इतके वर्ष तुम्ही काय केलं?’ निलेश राणेंचा शरद पवारांवर शाब्दिक हल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे भाजपचे (Maharashtra BJP) प्रदेश सचिव निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री (CM), जवळपास 20 वर्षे केंद्रात मंत्री (Union Minister), 50 वर्षे आमदार (MLA) किंवा खासदार (MP) आहेत, तरी ते बेरोजगारी, शेतकरी आत्महत्येवर बोलतात. मग इतके वर्षे काय केलं? असा सवाल निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केला आहे. त्यांनी ट्विट करुन शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विटमध्ये म्हटले की, 4 वेळा मुख्यमंत्री, जवळपास 20 वर्ष केंद्रात मंत्री, पन्नास वर्ष आमदार किंवा खासदार, अनेक संस्थांवर अध्यक्ष तरी पवार साहेब बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या वगैरे वर भाष्य करतात. मग प्रश्न पडतो इतके वर्ष तुम्ही काय केलं? तेव्हा काहीतरी केलं असतं तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं.

एकही काम शिल्लक नाही म्हणून…

मुंबईची (Mumbai) व महाराष्ट्राची सगळी कामं पूर्ण झाली आहेत, एकही काम शिल्लक नाही म्हणून शिवसेनेचे (Shivsena) नेते मंडळी नवनीत राणा (Navneet Rana) MRI मशीन मध्ये त्यांची तपासणी होताना बाहेरून फोटो कोणी काढला हे शोधण्यासाठी स्वतः लीलावती हॉस्पिटलला (Lilavati Hospital) गेले, हा प्रश्न महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा व गंभीर झाला आहे, असं म्हणत निलेश राणे यांनी ठाकरे सरकारला (Thackeray Government) टोला लगावला आहे.

 

Web Title :- Nilesh Rane | bjp leader nilesh rane criticize ncp sharad pawar for talking on unemployment farmer suicide


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aba Bagul | पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनामुळे संगीत-सांस्कृतिक जगताची मोठी हानी : आबा बागुल

Nikki Tamboli Glamorous Photo | हॉट आणि ग्लॅमरस… निक्की तांबोळीनं मादक फोटो शेअर करून नेटकऱ्यांना लावलं वेड..

PMC Water Supply | कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचा वापर वाढला ! पाणी बचतीसाठी पिण्याचे पाणी वापरणारी वॉशिंग सेंटर्स, बांधकामे बंद करणार

Pune Municipal Corporation (PMC) Election | पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना 17 मेला जाहीर होणार, राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Stock To Buy Today | 310 रुपयांच्या पुढे जाईल टाटा ग्रुपचा हा मल्टीबॅगर शेअर, आता स्वस्तात मिळत आहे स्टॉक, एक्सपर्टने म्हटले – खरेदी करा