Nilesh Rane | नीलेश राणेंची शरद पवार यांच्यावर टीका; म्हणाले…

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – पवार साहेबांचे राजकारण किती खालच्या पातळीचे असू शकते याचा धडधडीत पुरावा. 16 मे 1974 रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचे कौतुक करणार्‍या शरद पवारांना आज त्यांचे लिखाण चुकीचे वाटू लागले आहे. याच वृत्तीमुळे पवार साहेब बदनाम आहेत, अशी टीका एका ट्विटद्वारे नारायण राणे (Narayan Rane) यांचे पुत्र आणि भाजपाचे प्रदेश सचिव नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी शरद पवार यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पाठवलेले पत्र ट्विट केले आहे. (Nilesh Rane)

 

काल पुण्यात पार पडलेल्या शिवचरित्र ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते की, शिवछत्रपतींवर बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणे आणि त्यांच्या लिखाणाएवढा अन्याय दुसरा कुणीही केला नाही. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेवांचे योगदान काय?, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला होता. पवार यांच्या या परखड वक्तव्यावर नीलेश राणे यांनी ही टीका केली आहे. (Nilesh Rane)

 

आणखी एका ट्विटमध्ये नीलेश राणे यांनी म्हटले आहे की, पवार साहेबांना मधूनच बाबासाहेब पुरंदरे आठवतात, कारण दोन महिने झाले पवार साहेबांनी महाराष्ट्रात कुठलाही वाद लावला नाही. महाराष्ट्राला घुसमटत ठेवण्यामध्ये पवार साहेबांना नेहमीच समाधान मिळालेले आहे.

 

Web Title :- Nilesh Rane | bjp leader nilesh rane criticizes ncp leader sharad pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ravi Rana | ‘उद्धव ठाकरेंचं उरलेलं अस्तित्वही…’; रवि राणांचा संजय राऊतांवर गंभीर आरोप

 

Stock Market | Reliance चे गुंतवणुकदार झाले मालामाल, एका आठवड्यात इतक्या कोटीचा झाला फायदा

 

Chandrakant Patil’s Mother Passed Away | चंद्रकांत पाटील यांच्यावर दु:खाचा डोंगर, संघर्ष करायला शिवकवणारे मायेचे छत्र हरपले