Nilesh Rane | ‘पवारांबद्दल बाळासाहेब किती अचूक बोलायचे, हे ठाकरेंना कळलं असेल’ – निलेश राणे

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. राज्यसभा निवडणुकीत सहा जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात उतरल्याने सहाव्या जागेसाठी चुरस निर्माण झाली होती. भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) या दोन पक्षांमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजपने शिवसेनेचा पराभव करत सहावी जागा जिंकली. सहाव्या जागेवर भाजपचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) विजयी झाले तर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) यांचा पराभव झाला. यानंतर सत्ताधारी आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप रंगले आहेत भाजपचे प्रदेश सरचिटणीस (BJP State General Secretary) व माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर ट्विट करुन टीका केली आहे. पवारांबद्दल बाळासाहेब किती अचूक बोलायचे, हे ठाकरेंना कळलं असेल, अशा शब्दात निलेश राणेंनी (Nilesh Rane) टोला लगावला आहे.

 

 

या माणसात बिघडवण्याचं आणि जागेवर पलटी मारायचे टॅलेंट आहे, मतांचा कोटा पवार साहेबांनीच वाढवला आणि आता म्हणता मी त्यात पडलो नाही. आज उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) कळलं असेल स्व. बाळासाहेब ठाकरे (Late. Balasaheb Thackeray) पवार साहेबांबद्दल किती अचूक बोलायचे आणि समजायचे, अशा शब्दात निलेश राणे यांनी आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) प्रहार केला आहे. निलेश राणे (Nilesh Rane) यांनी हे सूचक ट्विट करत राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे गणित बिघडवण्यामागे शरद पवारच असल्याचा आरोप केला आहे.

काय म्हणाले शरद पवार?
अपक्षांना आपल्या बाजूने वळविण्यात भाजप यशस्वी ठरला आहे. अपक्ष आमदार (Independent MLA) आपलेसे करण्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना यश आलं. राज्यसभा निकालाने मला कोणताही धक्का बसलेला नाही. पण राज्यसभा जरी हरलो असलो तरी राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकारला (Thackeray Government) कोणताही धोका नाही, असे शरद पवार म्हणाले.

 

राजकारणात रिस्क घ्यावीच लागते, जी उद्धव ठाकरे यांनी घेतली.
अतिशय कमी मतं असतानाही त्यांनी ही जागा लढवली आणि ती जवळपास 33 मतापर्यंत आणली.
शिवसेनेच्या आमदारचं मत का बाद झालं मला माहित नाही. त्यांनी काय केलं मला माहित नाही,
\पण इतर तिघांसंबंधी जो निवडणूक आयोगाचा (Election Commission) निर्णय आहे तो योग्य आहे, असेही शरद पवार म्हणाले.

 

Web Title :- Nilesh Rane | bjp leader nilesh rane taunt uddhav thackeray over sharad pawar statement on devendra fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Deepali Sayed On BJP | ‘एका राज्यसभेने मुख्यमंत्री होता येत नाही, अनाजीपंतांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही’; दिपाली सय्यद यांचा टोला

 

Pooja Chavan Suicide Case | ‘पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांना क्लीन चीट द्या’, बंजारा महंतांची पुणे पोलिसांकडे मागणी

 

Pune Crime | पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ महिलेवर वार करून लुटले