Nilesh Rane | शिंदेंना ट्विट करता येतं का ? म्हणणार्‍या राऊतांना निलेश राणेंचा टोला; म्हणाले – ‘स्वत: दहावी दोनदा नापास…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nilesh Rane | एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुखांसह (Shivsena Party Chief) अनेक नेते बंडखोरांना लक्ष्य करत आहेत. शिवसेनेचे नेते खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, शिंदेंना स्वत:च्या हाताने ट्विट तरी करता येते का ? यावर आता भाजपाकडून (BJP) निलेश राणे (Nilesh Rane) यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

 

स्वत: दहावी दोनदा नापास…‘ असे म्हणत भाजपाचे नेते निलेश राणे यांनी विनायक राऊत यांना टोला लगावला आहे. निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत ही टिका केली आहे. खासदार विनायक राऊत कोण किती शिकले आणि कोणाला ट्विट करता येत नाही ते सांगतोय. हा स्वत: दहावी दोनदा नापास, जवळपास शिवसेनेच्या बारा वर्षाच्या सत्तेत याला एकदाही साधा राज्यमंत्री केला नाही आणि हा मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तींवर टीका करतो, अशा भाषेत निलेश राणे यांनी ट्विट केले आहे.

 

एकनाथ शिंदे यांच्यावर टिका करताना विनायक राऊत म्हणाले होते की, मी मध्यस्थी केल्यानेच बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) एकनाथ शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती. पण मला त्याचा पश्चाताप होत आहे. माझ्या हातून आयुष्यातील मोठे पाप झाले आहे. शिफारस केली नसती तर आमदारकी मिळाली असती का ? हे त्यांनी आई – वडिलांची शपथ घेऊन सांगावे, असे राऊत यांनी म्हटले होते.

एकनाथ शिंदे यांच्या विद्वत्तेबद्दल संशोधन करावे लागेल. कुणीतरी लिहून द्यायचे आणि ट्विट करायचे.
स्वत:च्या हाताने ट्विट करता येते का ? याचा अभ्यास करावा लागेल, असा टोलाही विनायक राऊत यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकटे पाडण्याचा कुटील डाव अलिबाबा 40 चोरांच्या माध्यमातून भाजपा खेळत असेल,
तर अलिबाबाची गुहा पोखरुन शिवसैनिक भगवा झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.

 

राऊत यांनी बंडखोरांना सवाल केला की, संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात तक्रार होती तर तुम्ही बैठकीत, चर्चेत हा मुद्दा मांडायला हवा होता.
आता केलेल्या गद्दारीचे खापर शंभूराजे देसाई (Shambhuraje Desai) हे संजय राऊत यांच्यावर फोडत आहेत.
उद्धव ठाकरे तुम्हाला सतत आवाहन करत असताना तुम्ही परत का आला नाहीत ?

 

Web Title :- Nilesh Rane | bjp nilesh rane slams shivsena vinayak raut over eknath shinde statement

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा