उध्दव ठाकरेंना निलेश राणेंचं आव्हान, म्हणाले – ‘मुख्यमंत्री आहात विसरा आणि होऊन जाऊ द्या एकदा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (cm uddhav Thackeray) यांनी दसरा मेळाव्यातून केलेल्या टीकेनंतर नारायण राणे (narayan rane) यांचे चिरंजीवांनी टीकेची तोफ डागली आहे. नारायण राणे यांची बेडकाशी तर त्यांच्या दोन मुलांची बेडकाच्या पिलांशी तुलना केल्यानंतर निलेश राणे (nilesh rane) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आव्हान (challange) दिलं आहे.

मागील काही दिवसांपासून राज्य सरकार आणि शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी रविवारी झालेल्या दसरा मेळाव्यात उत्तर दिलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी अनेक विषयावर भाष्य करताना भाजपचे नेते नारायण राणे यांच्यावर देखील टीका केली होती.

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला निलेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. ते म्हणाले, नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केलं. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल एक वाक्य, पण बिहारवर 20 मिनिटं. उद्धव ठाकरे हे धमकी कोणाला देतायेत, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहेत आणि होऊन जाऊदे एकदा.. तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो, अशी टीका करत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे.

श्रावणबाळ जन्माला घातला का ?
दुसऱ्यांची ‘पिल्ल’ वाईट. मग यांनी काय त्या दिनोच्या खुशीत नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा ‘श्रवणबाळ’ जन्माला घातला आहे का ? इतकी खुमखुमी आहे ना मग ती Disha salain ची केस मुंबई पोलिसांवर कुठला ही दबाव न टाकता नि:पक्षपाती चौकशी करु द्या. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते ! असे म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

You might also like