Nilesh Rane | ठाकरेंच्या घरातील सुंदर व्यक्तीमुळे एकाचा खून झाला? निलेश राणेंचे पुन्हा एकदा आक्षेपार्ह ट्विट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nilesh Rane | ठाकरेंच्या घरातल्या एका सुंदर व्यक्तीमुळे चव्हाण आडनाव असलेल्या एका व्यक्तीचा खून (Murder) करण्यात आला का? स्वर्गीय मीनाताई ठाकरे (Meena Thackeray) यांचा मृत्यू नेमका कसा झाला? त्यांचा मृत्यू (Death) झालेल्या दिवशी कर्जतच्या फार्म हाऊसवर (Farm House) काय झाले होते? हे महाराष्ट्राला कळाले पाहिजे, असे ट्विट नारायण राणे (Narayan Rane) यांचे पुत्र निलेश राणे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. हे ट्विट केल्यानंतर निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन ठाकरे कुटुंबियांवर (Thackeray Family) वैयक्तिक टीका केली.

 

पत्रकार परिषदेत निलेश राणे (Nilesh Rane) म्हणाले, ठाकरे यांनी आता त्यांची औकात ओळखावी, ते आता शून्य झाले आहेत. त्यांना आता कुत्रंही विचारत नाही. त्यामुळे त्यांनी राणेंच्या नादाला लागायचं नाही. आमच्यावर भुंकायला जे कुत्रे ठेवलेत, त्यांना पण ठाकरेंनी आवरायला सांगितलं पाहिजे. नाहीतर जाहीरसभा घेऊन सर्व गोष्टी बाहेर काढेन, असा इशारा निलेश राणे यांनी दिला.

 

 

दरम्यान, शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार प्रतापराव जाधव (MP Prataprao Jadhav) यांनी सुद्धा ठाकरे कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत.
बुलढाण्यात बोलताना प्रतापराव जाधव म्हणाले होते की, अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि
पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) हे आता तुरुंगात आहेत.
हे लोक महिन्याला वसुली करत होते. सचिन वाझे हे दर महिन्याला 100 खोके मातोश्रीवर पाठवत होते.

 

Web Title :- Nilesh Rane | chavhan surname man murder for beautiful person in thackeray family nilesh rane tweet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Electric Scooter Battery Blast In Mumbai | धक्कादायक! इलेक्ट्रिक बाइकमधील बॅटरीच्या स्फोटात 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Pune Chandni Chowk Traffic Start | चांदणी चौकातील वाहतूक साडे अकरा तासांनी पूर्ववत

Maharashtra CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, यंत्रणा सतर्क