‘रड्या ऑफ द ईयर’ हा अवॉर्ड दिला पाहिजे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – 2019 चा रड्या ऑफ द ईयर अवॉर्ड संज्यालाच दिला पाहिजे अशी टीका करत भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. निलेश राणे यांनी टीका करताना राऊतांचा एकेरी उल्लेख केला. राज्यसभेतील आसनव्यवस्थेत बदल केल्याने संजय राऊत नाराज होत त्यांनी राज्यसेभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडूंना पत्र पाठवलं होतं. याच मुद्द्यावरून निलेश राणेंनी राऊंतावर तोफ डागली.

राऊतांवर टीका करताना निलेश राणे म्हणाले, “तिसऱ्या रांगेवरून पाचव्या रांगेत बसवला म्हणून परत रडायला लागला. 2019 चा रड्या ऑफ द ईयर अवॉर्ड संज्यालाच दिला पाहिजे. मी कुठे बसतो त्यापेक्षा माझ्या पदाचा उपयोग देशाला कसा होईल हा विचार केला पाहिजे. परंतु यांचं राजकारण म्हणजे मी, मला आणि मीच असं म्हणत निलेश यांनी राणेंवर टीका केली.

दरम्यान एनडीएतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेला विरोधी बाकावर बसवण्यात आलं आहे. लोकसभा आणि राज्यसभेत त्यांच्या आसनव्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. यानंतर याच मुद्द्यावरून राऊतांनी नाराजी व्यक्त केली होती. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे त्याआधीच शिवसेना एनडीएतून बाहेर पडली आहे.

Visit : Policenama.com