शिवसेनेच्या मंत्र्याला चप्पलांचा हार घालावा वाटतो : निलेश राणे

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – उपअभियंत्याला शिवीगाळ करुन चिखलफेक केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर त्यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना मंत्र्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. खेडकड्यांमुळे धरण फुटल्याचे सांगणाऱ्या मंत्र्यांना चपलांचा हार घालावा वाटतो असे म्हणत निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली.

रस्त्यांच्या खराब स्थितीविरोधात आंदोलन केल्यानंतर नितेशवर कारवाई करण्यात आली. मात्र, ज्यांच्या कारभारामुळे तिवरे धरण फुटून २३ लोकांचा जीव गेला. त्या शिवसेनेच्या मंत्र्यावर कारवाई होत नाही. उलट तेच मंत्री खेकड्यामुळे धरण फुटल्याचा कांगावा करत आहेत. अशा मंत्र्यांना चपलांचा हार घालावा असे वाटते असे निलेश राणे यांनी म्हणत शिवसेनेवर तोफ डागली.

ठाकरे पिता-पुत्रांवर निशाणा
मुंबई महानगरपालिकेत युवासेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हस्तक्षेप वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या हस्तक्षेपाबाबत चर्चा होत आहेत. याच मुद्यावरून निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. ‘पालिकेतील विरोधी पक्षातल्या एका नगरसेवकांनी पोलिसांकडे कलम ३५३ खाली तक्रार करावी. बघा आदित्य ठाकरे पालिकेत यायचे बंद होतात की नाही. या ठाकरे बाप आणि मुलाच्या नावावर नाहीतरी एक पण केस नाही आणि केस घेण्याची धमक सुद्धा नाही,’ असं ट्वीट करत निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

Loading...
You might also like